AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खानच नव्हे, बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्सही आहेत परदेशी नागरिक, पाचवं नाव वाचून उंचावतील भुवया !

अभिनेता इम्रान खानला परदेशी नागरिकत्वामुळे मुंबई पोलिसांनी भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनात सहभागामुळे ही कारवाई झाली. इम्रानसह इतरही अनेक बॉलिवूड कलाकारांकडे परदेशी नागरिकत्व आहे. कोण आहेत ते ?

| Updated on: Oct 15, 2026 | 3:18 PM
Share
बॉलीवूड अभिनेता इम्रान खान बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच मुंबई पोलिसांनी त्याला भारत सोडण्याचा आदेश दिला असून, यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त  (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन झालं. त्यात इम्रान खान हा सहभागी झाला होता. मात्र इर्मानकडे भारतीय नागरिकत्व नाही तर US सिटीजनशिप आहे, त्याचा हवाला देत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पण फक्त इम्रानच नव्हे तर बॉलिवूडमधले असे आणखी काही कलाकारा आहेत, ज्यांच्याकडे परदेशातली सिटीझनशिप आहे. त्यामध्ये पाचव्या नंबरवर तर ती सौंदर्यवती अभिनेत्री आहे, जी नुकतीच आई झाली. जाणून घेऊया नावं.. ( All Photos : Social Media)

1 / 8
या यादीची सुरुवात बॉलिवूड अभिनेता इमरान खान याच्यापासूनच होते.  त्याचा जन्म अमेरिकेतील मॅडिसन, विस्कॉन्सिन येथे झाला होता. अमेरिकेत जन्म झाल्यामुळे त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आहे. अलीकडेच मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या CJP च्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना परदेशी नागरिकाकडून व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याची अधिकृत नोटीस बजावली आहे.

2 / 8
सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याकडेही दुहेरी नागरिकत्व असल्याचं सांगितलं जातं. कतरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला असून तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. परदेशी नागरिक असूनही ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

3 / 8
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारकडेही दीर्घकाळ कॅनडाचे नागरिकत्व होते. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चाही झाली. मात्र, नंतर त्याने अधिकृतरीत्या पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवले.

4 / 8
 बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टकडेही ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिची आई सोनी राजदान ही ब्रिटिश वंशाची आहे. त्यामुळे जन्माच्या आधारावर आलियाकडे ब्रिटनचा पासपोर्ट आहे. मात्र, ती भारतात राहूनच हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.

5 / 8
आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरात नाव कमावणाऱ्या दीपिका पदुकोण कडे डेनमार्कचे नागरिकत्व आहे. तिचा जन्म कोपनहेगन येथे झाला होता, त्यामुळे तिच्याकडे डॅनिश पासपोर्ट आहे. नुकतीच दुसऱ्यांदा आई झालेली दीपिका  तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

6 / 8
‘रॉकस्टार’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नरगिस फाखरी ही देखील भारतीय नागरिक नाही, तर तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. तिचा जन्म आणि संगोपन अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झाले. ती अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

7 / 8
बॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने ओळख निर्माण करणाऱ्या नोरा फतेही हिच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. कॅनडातील टोरंटो येथे तिचा जन्म झाला असून तिच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. ती मोरोक्कन-कॅनेडियन कुटुंबातील असून सध्या मुंबईत राहून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असते.

8 / 8
Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...