युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याचं सर्वत्र जोरदार कौतुक होताना दिसत आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या पदार्पण सामन्यात पठ्ठ्याने 171 धावांची दमदार खेळी केली होती.
1 / 5
भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघावर डावाने विजय मिळवला. जयस्वालला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
2 / 5
यशस्वीने पहिल्याच सामन्यात देशाबाहेर खेळताना त्याने शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या युवा खेळाडूचं आजी-माजी खेळाडू कौतुक करत आहेत. अशातच माजी खेळाडू हरभजन सिंहने यशस्वीबाबत एक भविष्यवाणी केली आहे.
3 / 5
मला वाटतं की यशस्वीचं द्विशतक न झाल्यामुळे तो निराशा असावा.पण तो भविष्यामध्ये खूप पुढे जाईल, असं हरजभन सिंहने म्हटलं आहे.
4 / 5
दरम्यान, यशस्वी जयस्वालने 382 चेंडू खेळताना 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 171 धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यात यशस्वीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.