AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवढे जन्माला येतात, त्यापेक्षा 10 लाख लोक मरताहेत, सायलंट एमर्जन्सी लागू; शेजारच्या देशात काय आक्रित घडतंय?

Population Crisis: सध्या भारताच्या शेजारील देशामध्ये सायलंट एमर्जन्सी लागू केली आहे. या देशात जेवढे जन्माला येतात त्यापेक्षा १० लाख लोक मारत आहेत. त्यामुळे या सरकाराने मोठा निर्णय घेतला आहे. आता हा देश कोणता? नेमकं काय सुरु आहे? हे चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 13, 2025 | 3:16 PM
Share
जगातील अनेक देशांमध्ये लोकसंख्येचे संकट गडद होत आहे. यामध्ये भारताचा मित्रदेश आघाडीवर आहे. या देशात सलग 16व्या वर्षी लोकसंख्या घसरली आहे. 2024 मध्ये या देशातील लोकसंख्येत 9 लाख 8 हजारांहून अधिक घट झाली. याचा अर्थ असा की देशात जन्मणाऱ्या लोकांपेक्षा मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर पुढील काही वर्षांत या देशाला अस्तित्वाच्या संकटाशी झुंजावे लागेल. या देशात निरोगी लोक आणि दीर्घायुष्यासाठी ओळखले जाते. परंतु सतत तरुण लोकसंख्येची कमतरता आणि वृद्ध लोकांच्या संख्येत वाढ यामुळे तिथल्या आरोग्य यंत्रणेवरही ताण वाढत आहे.

1 / 5
आम्ही ज्या देशाविषयी बोलत आहेत त्या देशाचे नाव जपान आहे. सध्याच्या परिस्थितीला जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी 'साइलेंट इमरजेंसी' असे संबोधले आहे. त्यांचे म्हणणे आहे की देशात मानवी लोकसंख्येचे संकट गडद होत आहे. ते म्हणाले, "आम्ही कुटुंबस्नेही धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करू, जसे की मोफत बालसंगोपन आणि कामाच्या वेळांबाबत लवचिक दृष्टिकोन स्वीकारला जाईल." आता तरी जपानमध्ये अशी अनेक धोरणे आहेत, परंतु महिला जास्त मुले जन्माला घालण्यास तयार नाहीत. एवढेच नव्हे, तर जपानमध्ये अशा महिलांची मोठी संख्या आहे, ज्यांनी एकही मूल जन्माला घातले नाही आणि जन्माला घालूही इच्छित नाहीत.

2 / 5
जपानमधील सध्याचा जन्मदर 1.2 आहे. धक्कादायक आकडा असा आहे की 2024 मध्ये जपानमध्ये केवळ 6,86,061 मुलांचा जन्म झाला, तर 1.6 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे जन्मणाऱ्यांच्या तुलनेत 10 लाख जास्त लोकांचा मृत्यू झाला. थोडक्यात सांगायचे तर, एक मूल जन्माला आले तर दोन लोक मरण पावले. सध्या जपानची लोकसंख्या 12 कोटी आहे आणि जर याच प्रकारे संख्येत घट होत राहिली तर देशात मानवी संसाधनांचे संकट निर्माण होईल. यामुळे अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य मानवी जीवनापर्यंत सर्व काही कठीण होईल. गेल्या 125 वर्षांच्या इतिहासात 2024 मध्ये जपानमध्ये सर्वात कमी मुले जन्माला आली.

3 / 5
याशिवाय, सलग 16वे वर्ष आहे जेव्हा जपानच्या लोकसंख्येत इतकी मोठी घट झाली आहे. ही परिस्थिती अशी आहे की जपानमध्ये मोठ्या संख्येने परदेशी लोक स्थायिक झाले आहेत. 1 जानेवारी 2025 च्या आकडेवारीनुसार, जपानच्या एकूण लोकसंख्येत 3 टक्के हिस्सा परदेशी लोकांचा आहे. गेल्या एका वर्षातच जपानच्या एकूण लोकसंख्येत 0.44 टक्क्यांची घट झाली आहे. याची भरपाई करण्यासाठी जपानने परदेशी लोकांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ही योजना यशस्वी होत नाही.

4 / 5
जपानच्या एकूण लोकसंख्येत 65 वर्षांवरील वृद्धांचा आकडा आता 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा जगातील दुसरा सर्वात मोठा आकडा आहे, पहिल्या क्रमांकावर मोनॅको आहे. जपानमध्ये सध्या केवळ 60 टक्के लोकसंख्या ही कामाच्या वयात आहे, म्हणजेच 15 ते 64 वर्षे वयोगटातील आहे. एवढेच नव्हे, ज्या प्रकारे जन्मदरात घट होत आहे, त्यामुळे पुढील काही वर्षांत वृद्धांची संख्या तरुणांपेक्षा जास्त होऊ शकते.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.