AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaurav More : याला म्हणतात गरीबीची जाणीव, गौरव मोरेने फ्लॅट घेताच जॉनी लिव्हरने भेट देऊन केलं कौतुक; खांद्यावर शाल, डोक्यावर टोपी…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या मुंबईतील नव्या घराला नुकतीच भेट दिली. मोरे कुटुंबाने त्यांचे पारंपरिक आदरातिथ्याने स्वागत केले. गौरवने जॉनी लिव्हर यांना आपले प्रेरणास्थान मानत, आशीर्वाद घेतले. ही भावनिक भेट मोरे कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरली, ज्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले.

| Updated on: Jul 08, 2026 | 4:23 PM
Share
ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी नुकतीच अभिनेते आणि विनोदी कलाकार गौरव मोरेच्या मुंबईतील पवई येथील नव्या घराला भेट दिली. या खास भेटीमुळे मोरे कुटुंबासाठी हा दिवस कायमचा स्मरणात राहणारा ठरला.

ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी नुकतीच अभिनेते आणि विनोदी कलाकार गौरव मोरेच्या मुंबईतील पवई येथील नव्या घराला भेट दिली. या खास भेटीमुळे मोरे कुटुंबासाठी हा दिवस कायमचा स्मरणात राहणारा ठरला.

1 / 5
गौरव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जॉनी लिव्हर यांचे पारंपरिक मराठी आदरातिथ्याने आणि मनापासून स्वागत केले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या गौरव याने या भेटीचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

2 / 5
पोस्टमध्ये गौरव यांनी जॉनी लिव्हर यांना आपले प्रेरणास्थान म्हणत खास कॅप्शन लिहीली.  प्रिय जॉनी लिवर सर आज आपले पाय आमच्या वास्तू ला लागले आणि आम्ही धन्य झालो.आम्हीच काय माझ संपूर्ण घर, येणारी पिढी,मागची पिढी सगळेच सुखावलो. तुमचा सिनेमा पाहता यावा म्हणून केलेली धडपड कधी दारात उभ राहून, तर कधी खिडकीत उभ राहून, आपले सिनेमे बघितले आहेत.आपण आमच्यासारख्या मुलांसाठी एक उर्जा आहात,आमचे गुरु आहात.खूप खूप प्रेम सर - असं गौरवने कॅप्शनमध्ये लिहीलं होतं.

3 / 5
घरी आल्यावर  गौरव मोरेने जॉनी लिव्हर यांना मिठी मारली आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. विशेष म्हणजे, जॉनी लिव्हर यांनीही गौरव आणि त्यांच्या कुटुंबासाठी भेटवस्तू आणत त्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला.

4 / 5
या पोस्टखाली अभिनेते जितेंद्र जोशींसह अनेक सेलिब्रेटींनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी गौरव मोरेवर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावर बरेच लाईक्स आणि कमेंट्सही आलेत.

या पोस्टखाली अभिनेते जितेंद्र जोशींसह अनेक सेलिब्रेटींनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी गौरव मोरेवर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावर बरेच लाईक्स आणि कमेंट्सही आलेत.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ