यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिची डायरीही जप्त केली आहे. तिच्या डायरीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
1 / 6
ज्योती मल्होत्राने तिच्या या डायरीत पाकिस्तानचा उल्लेख केला आहे. तपास यंत्रणा तिची सखोल चौकशी करत आहेत. तिच्या याच डायरीची काही पानं समोर आली आहेत. तिची ही डायरी 2012 सालाचे कॅलेंडर असणारी आहे.
2 / 6
ज्योतीने पाकिस्तानप्रतीची तिची भावनाही या डायरीत लिहिली आहे. आपण सर्व एक धरती, एकाच मातीचे बनलेले आहोत, असंही तिने आपल्या डायरीत लिहिलं आहे.
3 / 6
सोबतच पाकिस्तानात फिरायला मला फारच कमी वेळ मिळाला, अशी खंतही तिने आपल्या या डायरीत व्यक्त केली आहे.
4 / 6
मी दहा दिवसांचा प्रवास करून पाकिस्तानात आली आहे. पाकिस्तानची जनता माझ्याशी फार प्रेमाने वागली. लाहोर शहर फिरायला फक्त दोन दिवस मिळाले, असंही तिने आपल्या डायरीत लिहून ठेवलंय.
5 / 6
सीमांमुळे निर्माण झालेले अंतर लवकर मिटावे. तसेच एकमेकांप्रतीचा सर्व रुसवा-फुकवाही मिटावा, अशी अपेक्षाही तिने आपल्या डायरीत व्यक्त केलीय.