1/5

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करुन महाराष्ट्रासह नाशिकचं नाव उंचावणाऱ्या धावपट्टू कविता राऊत यांना शासकीय नोकरीसाठी वणवण फिरावं लागत आहे.
2/5

कविता राऊत यांना सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाते. 2012 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
3/5

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन क्लास 1 च्या पदासाठी नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे.
4/5

कविता राऊत यांनी 2009 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. 2010 मध्ये त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत रजतपदक मिळवले.
5/5

2010 मध्ये भारतात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये कविता राऊत यांनी रजतपदक मिळवले. मिल्खा सिंग यांनी 1958 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर कविता राऊत यांनी 50 वर्षांनी भारताला राष्ट्रकुलमधील धावण्याच्या स्पर्धेत यश मिळवून दिले.