Happy Mother’s Day 2021 : ‘या’ आहेत बॉलिवुडच्या 10 सुपर हॉट मॉम्स, ज्यांनी आपल्या फिटनेसमधून सर्वांना धक्का दिला

मातृत्व दिनानिमित्त आपण त्यापैकी अशाच निवडक 10 आईंविषयी माहिती घेणार आहोत ज्यांनी आपल्या फिटनेसने सर्वांनाच धक्का दिला.

1/11
बॉलिवुडमध्ये अनेक अभिनेत्री आई बनल्यात. त्या आपल्या मुलांसोबत कायमच दिसत आल्यात. आज मातृत्व दिनानिमित्त आपण त्यापैकी अशाच निवडक 10 आईंविषयी माहिती घेणार आहोत ज्यांनी आपल्या फिटनेसने सर्वांनाच धक्का दिला. या आई आपल्या हॉट अदांमुळे कायमच चर्चेत असतात.
2/11
बॉलिवुडची सुपरफिट अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिचा मुलगा अरहान खानसोबत. मलायका आणि अरहानचं खूप जवळचं नातं आहे. मलायका अरबाज खानपासून बाजूला झाल्यानंतर सध्या अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चांगलीच चर्चेत आहे.
3/11
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या बच्चनची जोडी मैत्रिणी प्रमाणे आहे. ऐश्वर्याने आराध्याच्या जन्मानंतरही काम थांबवलं नाही. काही खूप निवडक चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाचं दमदार प्रदर्शन केलं. ऐश्वर्याने आराध्याच्या पालनपोषणावर बरंच लक्ष दिल्याचं दिसतं.
4/11
बॉलिवुडची सुपरफिट हॉट मॉम्समध्ये आघाडीवर असलेली शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty). शिल्पा शेट्टीचं नाव तिच्या फिटनेससाठी सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत असतं. शिल्पा दोन मुलांची आई आहे. तिच्या मुलाचं नाव विवान आहे आणि मुलीचं नाव समीषा आहे.
5/11
बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर खान ( Kareena Kapoor Khan) देखील दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने आपल्या दुसऱ्या मुलाला नुकताच जन्म दिलाय. पहिले मुलाचं नाव तैमूर अली खान असं आहे.
6/11
अभिनेत्री काजोलला (Kajol) 2 मुलं आहेत. यात एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे. काजोलच्या मोठ्या मुलीचं नाव न्यासा देवगन आहे. तसेच छोट्या मुलाचं नाव युग देवगन आहे.
7/11
अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma ) या वर्षीच 4 जानेवारी रोजी एका मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव वामिका असं आहे.
8/11
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) 2019 मध्ये एका मोठ्या संघर्षानंतर कॅन्सरवर मात केलीय. सोनालीला एक मुलगा आहे. तिच्या मुलाचं नाव रणवीर बहल आहे. सोनालीने प्रोड्यूसर गोल्डी बहलसोबत लग्न केलंय.
9/11
बॉलिवूडची सुपर हॉट आई असलेल्या अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) मुलाचं नाव वीर आहे. ती आपल्या मुलासोबत अनेक स्पोर्ट्स करताना दिसते. यात रनिंग आणि स्विमिंगचा समावेश आहे.
10/11
रवीना टंडन (Raveena Tandon) एकूण 4 मुलांची आई आहे. त्यांची नावं छाया टंडन, पूजा टंडन, रशा टंडन आणि रणबीर टंडन अशी आहेत. यापैकी तिने 1995 मध्ये दोन मुलं दत्तक घेतली होती. त्यांची नावं पूजा आणि छाया अशी आहेत. त्यावेळी पूजाचं वय 11 आणि छायाचं वय 8 वर्षे होतं. तिच्या या मुलींची लग्न होऊन ती 2019 मध्ये आजीही बनली आहे.
11/11
ट्विंकल खन्नाला (Twinkle Khanna) 2 मुलं आहेत. मुलाचं नाव आरव कुमार आहे आणि मुलीचं नाव नितारा कुमार आहे. ट्विंकल खन्ना फिटनेसमध्ये अक्षय कुमारलाही टक्कर देते.