कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या पोहाळे परिसरातील शेतात गव्याच्या कळपांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भातासह ऊस पिकाचं मोठं नुकसान होत आहे.
1 / 5
नुकत्याच झालेल्या पावसामुळे भाताचं पीक तरारून आलय. हे पीक गव्याकडून पायदळी तुडवलं जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.
2 / 5
दरवर्षी नुकसान केलं जात असल्यान भात पिकाकडे वळलेत मात्र या पिकाचही नुकसान होताना होतय. या गव्यांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी पिका भोवती तारेच कुंपण तसंच लाल कापड लावण्याचा देखील प्रयत्न केला.
3 / 5
गव्याकडून शेतीचे नुकसान सुरूच आहे. गव्यांच्या वाढत्या त्रासाबाबत वनविभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झालेत.
4 / 5
आमची शेती सरकारनं ताब्यात घ्यावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे