Skin Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ उपाय करा!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी
Updated on: Jul 14, 2021 | 1:11 PM
पावसाळा सुरू होताच केस गळण्याची समस्या वाढते. काही लोकांचे केस गळतात आणि तणाव निर्माण होतो. तज्ञांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात ओलावा वाढल्यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते.
Jul 14, 2021 | 1:11 PM
पावसाळा सुरू होताच केस गळण्याची समस्या वाढते. काही लोकांचे केस गळतात आणि तणाव निर्माण होतो. तज्ञांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात ओलावा वाढल्यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते.
1 / 5
केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी एक कप बदाम तेल, एक वाटी मध आणि एक कप कॅमोमाईल पाने मिसळून तेल तयार करा. हे तेल बाॅटलमध्ये भरा आणि ठेवा. हे तेल आठवड्यातून दोनदा केसांवर लावा आणि एक तासांसाठी सोडा.
2 / 5
पावसाळ्यात केसात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत महिलांनी केसांमध्ये तेल चांगले लावावे. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होणार नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात नारळ तेलात कापूर मिसळा आणि कोमट झाल्यावर केसांमध्ये मालिश करा.
3 / 5
केस गळती कमी करण्यासाठी केळी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी एक केळी, एक वाटी दही, अर्धी वाटी मुलतानी माती, दोन ते तीन चमचे मध, कोरफड जेल, एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि केसांवर लावा.
4 / 5
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी झोपण्याच्या अगोदर केसांना खोबरेल तेल लावा. यामुळे केस गळती कमी होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)