AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला शिकवीन..’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अधिपतीला भुवनेश्वरीचं सत्य आधीपासूनच ठाऊक?

अक्षरा खरंच घर सोडून जाईल का, अधिपतीने हे सत्य अक्षरापासून लपवण्यामागचं खरं कारण काय असेल, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'तुला शिकवीन चांगलाच धडा'च्या आगामी भागात मिळतील. ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 27, 2024 | 12:07 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. भुवनेश्वरीचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षराची कसरत चालू आहे. भुवनेश्वरी परत आलीये या मतावर अक्षरा ठाम आहे.

1 / 8
भुवनेश्वरी-चारुलता या भोवऱ्यात अक्षरा पूर्णपणे अडकली आहे. चारुलताच्या म्हणण्यावरुन घरातल्या सगळ्यांनाच यावर विश्वास बसू लागतो की अक्षराला मानसिक उपचाराची गरज आहे. अक्षरावर घरी कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही.

2 / 8
पण अक्षरा वारंवार भुवनेश्वरीला म्हणजेच चारुलताला आता थेट वॉर्निंग देऊ लागली आहे की ती हे सिद्ध करुन दाखवणार की चारुलता म्हणजेच भुवनेश्वरी आहे. अक्षरा अधिपतीकडे हट्ट करते की बाबा आणि चारुलताचं लग्न थांबवलं पाहीजे.

3 / 8
पण दुसरीकडे भुवनेश्वरी चारुहासला सांगते की अक्षराची तब्येत बघता लग्नाचा मुहूर्त अलिकडचाच घेतला पाहिजे.  अक्षराला वेडी ठरवण्यात भुवनेश्वरी यशस्वी होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4 / 8
अनपेक्षितपणे दारात  मनोरुग्णालयाची एक व्हॅन अक्षराला घेऊन जाण्यासाठी येते. ही संधी साधून भुवनेश्वरी तिच्या आणि चारुहासच्या लग्नाची व्यवस्था करते. पण  लग्नाच्या दिवशीच अक्षरा मनोरुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी होते.

5 / 8
तिच्या बंदिवासात अक्षराने काही पुरावे गोळा केले आहेत.  ती सर्वांसमोर भुवनेश्वरीच चारुलता आहे हे उघड करण्यासाठी लग्नात पोहोचते. या पुराव्यांमुळे चारुहास पूर्णपणे हादरणार आहे. तिथेच अक्षराला हे देखील कळणार आहे की अधिपतीला या सर्व गोष्टी पहिल्यापासून माहित आहेत. या सगळ्यामुळे अक्षरा आणि अधिपती यांच्यात जोरदार वाद होऊन अक्षरा घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे.

6 / 8
मालिकेत नवरी म्हणून नटण्याचा आनंद व्यक्त करताना अभिनेत्री कविता लाड म्हणाल्या, "खासगी आयुष्यात कविता इतकी नटत नाही पण 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या निमित्ताने आणि खास म्हणजे भुवनेश्वरीमुळे मला खूप नटायला मिळत."

7 / 8
"एरवी नुसतं नटणं ठीक आहे. पण मालिकेतलं नटण चार-पाच दिवस चालतं. आता  सध्या मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. जोपर्यंत शूट संपत नाही तोपर्यंत या मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागत. कंटिन्यूटी लक्षात ठेवणं एक कसरत आहे. त्यामुळे मी तयार झाली की  कॅमेरासमोर उभी राहायच्या आधी  एकदा सहायक दिग्दर्शकला सांगते एकदा तुम्हीही बघा की सर्व ठीक आहे ना? चारुलताच्या नवरी लूकमधला माझा आवडता दागिना नथ आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.