सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्या पुन्हा अडचणी वाढणार?

मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याचं बोललं जातंय. कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलंय. मात्र अंजली दमानिया यांनी त्या निकालावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती. आता हायकोर्टानं काय म्हटलंय? हे जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 01, 2024 | 9:41 PM
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. भुजबळांना  महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त ठरवणाऱ्या निकालाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्याप्रकरणात आता मुंबई हायकोर्टानं येत्या 4 आठवड्यात पुन्हा सुनावणी ठेवलीय.

1 / 5
कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 9 सप्टेंबर 2021 ला भुजबळांना सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं. मात्र या प्रकरणात जाणून-बुजून पुरावे दडपले गेल्याचा आरोप अंजली दमानियांचा होता.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 9 सप्टेंबर 2021 ला भुजबळांना सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं. मात्र या प्रकरणात जाणून-बुजून पुरावे दडपले गेल्याचा आरोप अंजली दमानियांचा होता.

2 / 5
गेली दीड वर्ष अंजली दमानिया या निर्णयाला आव्हान देण्याच्या पाठपुरावा करत होत्या. मात्र 5 न्यायाधीशांनी 'नॉट बिफोर मी' सदर प्रकरण आमच्यासमोर नाही असं उत्तर दिल्याचं दमानियांनी म्हटलं.

गेली दीड वर्ष अंजली दमानिया या निर्णयाला आव्हान देण्याच्या पाठपुरावा करत होत्या. मात्र 5 न्यायाधीशांनी 'नॉट बिफोर मी' सदर प्रकरण आमच्यासमोर नाही असं उत्तर दिल्याचं दमानियांनी म्हटलं.

3 / 5
अखेर अंजली दमानियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी संबंधित याचिका पटलावर घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाला दिले. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयानं येत्या ४ आठवड्यात एसीबीसह निर्दोष ठरलेल्या भुजबळांनाही नोटीस पाठवलीय. मात्र संबंधित प्रकरण दुसऱ्या व्यक्तीबाबत असल्याचा दावा छगन भुजबळांनी केलाय.

4 / 5
दरम्यान याप्रकरणात पुढे काय होतं? ते ४ आठवड्यांनी समोर येईल. मात्र कधीकाळी भाजपनंच भुजबळांवर जे आरोप केले होते, त्याचप्रकरणावरुन हायकोर्टानं पुन्हा सुनावणी सुरु केलीय, आणि आत्ता भुजबळ भाजपसोबत सत्तेत असल्यानं निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना आयता मुद्दा मिळणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.