AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2025 : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? यामागे दडलेलं खरं कारण काय?

आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे कपडे घालण्याची परंपरा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यामागे सामाजिक एकता आणि सौहार्द निर्माण करण्याचा उद्देश आहे. विभिन्न रंग देवीच्या वेगवेगळ्या गुणांचे प्रतीक मानले जातात, परंतु हा रंग निवडणे सक्ती नाही.

| Updated on: Sep 22, 2025 | 1:49 PM
Share
आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात गरबा, दांडिया आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात.

1 / 10
आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

2 / 10
या उत्सवाचे एक खास आकर्षण म्हणजे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करणे. यंदाही नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक रंग ठरवण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून बहुतांश लोक त्याच रंगाचे कपडे परिधान करताना दिसतात.

3 / 10
नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे घालण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय झाली आहे. प्रत्येक दिवसाचा रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. या रंगांचे कपडे घातल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.

4 / 10
मिळालेल्या माहितीनुसार, या परंपरेमागे कोणतेही धार्मिक कारण नाही. कोणताही धर्मग्रंथ विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याचा नियम सांगत नाही. जर तुम्ही ठरवलेल्या रंगाचे कपडे घातले नाहीत, तर पाप लागेल किंवा देवीचा कोप होईल, असे काहीही नाही.

5 / 10
हे रंग फक्त त्या-त्या दिवसाच्या वारावरून ठरवले जातात. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये प्रत्येक वारासाठी एक विशिष्ट रंग दिला आहे. त्यानुसार हे रंग ठरवले जातात.

6 / 10
प्रत्येक आठवड्यात सात वार असतात आणि नवरात्रीचे नऊ दिवस असतात. त्यामुळे, जे दोन वार पुन्हा येतात, त्या दिवशी त्या रंगाचा सिस्टर कलर  म्हणजेच जवळचा रंग निवडला जातो. यानुसार नऊ रंग ठरवले जातात.

7 / 10
या परंपरेचा मुख्य उद्देश सामाजिक एकोपा आणि समानता वाढवणे हा आहे. जेव्हा अनेक लोक एकाच रंगाचे कपडे घालतात, तेव्हा त्यांच्यात आपण सर्व एक आहोत अशी भावना निर्माण होते.

8 / 10
यामुळे आनंदाचे वातावरण तयार होते आणि सुरक्षिततेची भावना वाढते. कोणताही धर्मग्रंथ सांगत नसतानाही लोक स्वतःहून या परंपरेत उत्साहाने सहभागी होतात, हीच यामागची खरी गंमत आहे.

9 / 10
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...