Photo : नेटफ्लिक्सकडून ‘फ्री सब्सक्रिप्शन’ ऑफर; आता मनसोक्त वेब सीरिज, सिनेमे पाहा

जास्तीत जास्त लोकांना नेटफ्लिक्सकडे आकर्षित करण्याचा नवा प्रयत्न नेटफ्लिक्सनं केला आहे. ( Netflix will give free subscription for 2 days in india )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:40 PM, 21 Oct 2020
1/6
तुम्ही नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन केलं नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता नेटफ्लिक्सकडून 'फ्री सब्सक्रिप्शन' देण्यात येत आहे. मात्र यात त्यांनी एक ट्विस्ट आणला आहे. हे सब्सक्रिप्शन फक्त दोन दिवसांसाठी असणार आहे. म्हणजेच 48 तास तुम्हाला नेटफ्लिक्स मोफत वापरता येणार आहे.
2/6
3/6
यापूर्वी नेटफ्लिक्सकडून एक महिन्याचं फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत होतं, मात्र काही दिवसांपूर्वी ते बंद करण्यात आलं आहे.
4/6
ही ऑफर सध्या भारतीय ग्राहकांसाठी आहे. या ऑफरची सुरुवात येत्या 4 डिसेंबरपासून होणार आहे.
5/6
StreamFest असं या ऑफरचं नाव आहे, यासंदर्भातील महत्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कुठलेही कार्ड डिटेल्स देण्याची गरज नाही.
6/6
यापूर्वी फ्री ट्रायलसाठी पेमेंट डिटेल्स देण्याची सक्ती होती. त्यावेळी सब्सक्रिप्शन कॅन्सल करण्याची मूभा होती.