ग्रामसेवक सतत गैरहजर, कामं खोळंबली, वैतागलेल्या ग्रामस्थांची ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी!

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामस्थांच्यावतीने ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलंय.

1/5

2/5
कौसडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक बी. एस.खराबे हे मागील अनेक दिवसापासून सतत गैरहजर राहत असल्याने गावातील नागरिकांचे कामे खोळंबली आहे. यामुळे ग्रामस्थ ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने पूर्णत: वैतागली आहे.

3/5
सध्या गावामध्ये पावसाच्या पाण्यामुळे गटारी नाल्या तुडुंब भरले असून जागोजागी पाण्याचे डबके साचले आहे... गावात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. यामुळे गावत अनेक रोग डोके वर काढतानी दिसत आहे.

4/5
डासांवर नियंत्रण करण्यासाठी गावात धूर फवारणी करणे गरजेचे आहे. मागील अनेक दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थ धूर फवारणी करून घेण्यासाठी चकरा मारतात. परंतु कार्यालयांमध्ये ग्रामसेवक उपस्थित नसतात.

5/5
तसेच ग्रामस्थांना ग्रामसेवकाकडून लागणारी कागदपत्रे घेण्यासाठी सुद्धा चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी दाखविली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI