Photo : राज्यात रात्रीची संचारबंदी, रस्त्यांवर शुकशुकाट, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Mar 28, 2021 | 10:58 PM
सागर जोशी

|

Mar 28, 2021 | 10:58 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रविवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शहर आणि गावांमध्ये पोलिसांकडून दुकाने, हॉटेल्स यांसह विविध आस्थापने बंद करण्यात आली आहे.

1 / 6
मुंबईतही रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका परिसरात रस्ते रिकामे केले.

2 / 6
नाईट कर्फ्यू

नाईट कर्फ्यू

3 / 6
राज्य सरकारकडून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करावाईचे आदेशही देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

4 / 6
चित्रपटगृह, मॉल, उपहारगृहे, सार्वजनिक उद्याने, चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर संचारबंदी आदेश लागू असतील. उपहारगृहे बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीची सुविधा सुरु ठेवण्यात आलीय.

5 / 6
पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें