PHOTOS : पंजाबमधील किसान सभेच्या शेतकऱ्यांची दुसरी तुकडी दिल्लीच्या सिंघु सीमेवर परतली!

शनिवारी (29 मे) अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील शेकडो शेतकऱ्यांची दुसरी तुकडी आपली गव्हाची कापणी पूर्ण करून दिल्लीजवळ सिंघू सीमेवर परतली.

1/10
शनिवारी (29 मे) अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील शेकडो शेतकऱ्यांची दुसरी तुकडी आपली गव्हाची कापणी पूर्ण करून दिल्लीजवळ सिंघू सीमेवर परतली. पहिली तुकडी 16 मे रोजी पोहचली होती.

2/10
सिंघु येथे तिचे स्वागत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद यांनी केले.

3/10
स्वागत करण्यास उपस्थित असलेल्या पंजाब किसान सभेच्या नेत्यांमध्ये सरचिटणीस मेजर सिंग पुनेवाले, उपाध्यक्ष धरमपाल सिंग सील, सहसचिव गुरमिक सिंग फजाल, कोषाध्यक्ष बलदेव सिंग लटाला, राज्य कमिटी सदस्य बलजीत सिंग ग्रेवाल, सीटूचे नेते महेंद्र कुमार, जमसंच्या नेत्या सुभाष मट्टू आणि हरियाणा किसान सभेचे नेते एस. एन. सोलंकी यांचा समावेश होता.

4/10
लाल झेंडे घेऊन किसान सभेची रॅली सिंघु सीमेवरील विस्तीर्ण शेतकरी कॅम्पमधून 5 किलोमीटर चालत मुख्य स्टेजपर्यंत आली.

5/10
तिथे संयुक्त किसान मोर्चातर्फे जाहीर सभा झाली. यावेळी डॉ. अशोक ढवळे आणि पी. कृष्णाप्रसाद यांची भाषणे झाली.

6/10
मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवून संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या 26 मेच्या 'निषेध दिना'ची हाक देशभर अभूतपूर्व प्रमाणात लाखोंनी यशस्वी केल्याबद्दल जनतेचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

7/10
येत्या 5 जूनला, ज्या दिवशी गेल्या वर्षी मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे अध्यादेशांच्या स्वरूपात प्रथम काढले.

8/10
त्या दिवशी तिन्ही कायद्यांची होळी करण्याचा संयुक्त किसान मोर्चाचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

9/10
योगायोग म्हणजे 5 जून 1974 रोजी जयप्रकाश नारायण यांनी प्रथम विशाल जनचळवळीची हाक दिली होती.

10/10
त्यातूनच 3 वर्षांनंतर आणीबाणीची राजवट जनतेने उलथून टाकली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI