Maharashtra Day 2021 | राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हुतात्म्यांना अभिवादन

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. (Maharashtra Day 2021 CM Uddhav Thackeray hutatma chowk)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:36 AM, 1 May 2021
1/14
आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
2/14
1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.
3/14
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
4/14
आज सकाळी हुतात्मा चौक येथील स्मारकास मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
5/14
यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मुख्य सचिव सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर हे देखील उपस्थित होते.
6/14
या सर्वांनीही हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
7/14
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
8/14
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या
9/14
महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
10/14
गेल्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता.
11/14
यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन कोरोना संकटामुळे साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
12/14
पाहा आणखी फोटो
13/14
पाहा आणखी फोटो
14/14
पाहा आणखी फोटो