PHOTO | कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारतीय रेल्वे मैदानात, महाराष्ट्रामध्ये ‘या’ जिल्ह्यात आयसोलेशन कोच सेवा सुरु

महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे देखील कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरली आहे. (Railway isolation centre)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:23 PM, 18 Apr 2021
1/5
Railway isolation centre
कोरोना विरुद्धच्या लढ्यात रेल्वे पूर्ण ताकदीनं उतरत आहे,असं पियुष गोयल म्हणाले. महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये रेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आलं आहे.
2/5
Railway isolation centre
भारतीय रेल्वेकडून आयसोलेशन कोचमध्ये एसीची देखील सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा फटका देशात सर्वाधिक बसला आहे.
3/5
Railway isolation centre
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेची आयसोलेशन सेवा नंदुरबार जिल्ह्यात सुरु केल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
4/5
शनिवारी महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रेल्वेचे आयसोलेशन कोच फायदेशीर ठरणार आहेत.
5/5
Railway isolation centre
महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे देखील कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरली आहे.