AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप, पण OTTवर धुमाकूळ; टॉप 10 मध्ये मारली बाजी

बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप 10 मध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे. यामध्ये आर. माधवनची मुख्य भूमिका आहे.

| Updated on: Sep 08, 2026 | 12:41 PM
Share
ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त ओरिजिनल चित्रपटच प्रदर्शित होत नाहीत, तर थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांचंही नशीब ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकदा पालटतं. 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका बायोग्राफिकल चित्रपटाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. ऑगस्टरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण बॉक्स ऑफिसवर तो सपशेल अपयशी ठरला. हाच चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5
या चित्रपटाचं नाव आहे 'जीडीएन'. थिएटरमध्ये फारशी कमाई न करू शकलेल्या या चित्रपटाने डिजिटल रिलीज झाल्यानंतर Netflix वर टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर निराशाजनक ठरलेल्या या चित्रपटाला ओटीटीच्या माध्यमातून नवी संधी मिळाली आहे.

2 / 5
‘GDN’ हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय संशोधक आणि उद्योगपती जी. डी. नायडू यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांना भारताचे ‘एडिसन’ म्हणूनही ओळखलं जातं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरुवात करून तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जी. डी. नायडू यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

3 / 5
या चित्रपटात आर. माधवनने जी. डी. नायडू यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे माधवनने या चित्रपटाच्या निर्मितीतही सहभाग घेतला असून, त्याने पत्नी सरिता माधवनसोबत चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’नंतर माधवनचा हा आणखी एक बायोग्राफिकल प्रोजेक्ट आहे. चित्रपटात प्रियामणी, सत्यराज, जयराम आणि दुशारा विजयन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

4 / 5
GDN या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाची जगभरातील कमाई सुमारे 6.32 कोटी रुपये राहिली. मात्र, थिएटरमधील अपयशानंतर सिनेमाला आता OTTवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 4 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग सुरू झाल्यानंतर ‘GDN’ टॉप 10 मध्ये ट्रेंड होऊ लागला.

5 / 5
Follow Us
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा