AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षांचं लग्न मोडलं, आता मुलीला एकटीने वाढवतेय अभिनेत्री; म्हणाली, मी विसरून जाते…

अभिनेत्री संजीदा शेखने मातृत्व आणि करिअरबाबत स्पष्ट भूमिका मांडली. कामावर असताना माझे संपूर्ण लक्ष कामावरच असते, असं ती म्हणते. वैयक्तिक आयुष्यातील गॉसिपचा परिणाम मी स्वतःवर होऊ देत नाही, असंही तिने सांगितले. घटस्फोटानंतर मुलीचा सांभाळ करत असताना, ग्लॅमर आणि प्रसिद्धीपासून दूर राहून साधेपणाने जगणे तिला आवडतं.

| Updated on: Sep 12, 2026 | 2:22 PM
Share
 अभिनेत्री संजीदा शेख ही टीव्हीपासून चित्रपट आणि ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, ग्लॅमरच्या दुनियेत असूनही संजीदा नेहमीच प्रसिद्धी आणि दिखाव्यापासून दूर राहणं पसंत करते. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही ती फारशी चर्चा करताना दिसत नाही. (All photos : Instagram / iamsanjeeda)

1 / 7
 नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान संजीदाला, “मुलीच्या जन्मानंतर तू अधिक चांगली अभिनेत्री झालीस असं तुला वाटतं का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने स्पष्टपणे, “मला असं वाटत नाही,” असं उत्तर दिलं.

2 / 7
संजीदाने सांगितलं की, “जेव्हा मी कामावर असते, तेव्हा माझं संपूर्ण लक्ष कामावरच असतं. त्या वेळी माझी मुलगी आहे, हेही मी विसरून जाते. कारण मला माहीत असतं की ती सुरक्षित आहे.” काम आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी ती आपल्या पद्धतीने सांभाळत असल्याचं तिच्या या वक्तव्यातून स्पष्ट होतं.

3 / 7
आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत होणाऱ्या चर्चांवरही संजीदाने स्पष्ट भूमिका मांडली. “बाहेरच्या जगात जे गॉसिप सुरू असतं, त्याचा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ देत नाही. लोक काय म्हणतात, यानेही मला फरक पडत नाही,” असं तिने सांगितलं.

4 / 7
संजीदाला तिच्या फिटनेसचं रहस्य विचारण्यात आलं असता तिनेही अगदी साधं उत्तर दिलं. “मी अतिशय नॉर्मल मुलगी आहे आणि नॉर्मल राहायला मला आवडतं. फिट राहण्यासाठी मी खूप जास्त मेहनत करत नाही,” असं ती म्हणाली.

5 / 7
संजीदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिने 2 मार्च 2012 रोजी अभिनेता आमिर अलीसोबत लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आहे. मात्र, लग्नाच्या जवळपास दहा वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी घटस्फोट घेतला.

6 / 7
सध्या संजीदा आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ करत आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून तिचं नाव अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत जोडलं जात आहे. मात्र, या चर्चांवर संजीदाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

7 / 7
Follow Us
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती

पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान