Photo : मराठमोळ्या सिद्धार्थचं कमबॅक! नव्या फोटोशूटवर लाईक्सचा पाऊस

‘स्टार प्रवाह’वरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतून सिद्धार्थ आता पुनरागमन करतोय .(Siddharth’s comeback! Fan loved his new photoshoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:18 PM, 30 Nov 2020
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर परत लाइम लाइटमध्ये आला आहे. आता तो परत एकदा प्रत्येक मराठी मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘स्टार प्रवाह’वरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतून तो आता पुनरागमन करतोय .
लॉकडाऊनमुळे सगळे कलाकार घरात अडकले होते. मात्र आता तुमचे हेच लाडके कलाकार तुमच्यासाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन आले आहेत.
सध्या सिद्धार्थचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
सिद्धार्थ आणि त्याची होणारी बायको अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. दोघांनीही नव्या मालिकांमधून इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केलं आहे.