AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Purple Cap Winner | ट्रॉफी गमावली पण पर्पल कॅप जिंकली, घातक गोलंदांजाना पछाडत कोण ठरला मानकरी?

IPL 2023 Purple Cap Winner | चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली. गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याने ऑरेन्ज कॅप पटकावली. मात्र पर्पल कॅपसाठी गुजरातच्या 3 गोलंदाजांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

| Updated on: May 30, 2023 | 10:59 PM
Share
आयपीएल 16 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स चॅम्पियन ठरली. मात्र ऑरेन्ज आणि पर्पल कॅप्स उपविजेत्या गुजरात टायटन्स टीमने पटकावल्या. ऑरेन्ज कॅप शुबमन गिल याने पटकावली.  तर मोहम्मद शमी 17 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेत पर्पल कॅप पुरस्काराचा मानकरी ठरला. मात्र शमीला आपल्याच सहकाऱ्यांचं आव्हान होतं.

1 / 6
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्याच्या यादीत गुजरात टायटन्स टीमचा मोहित शर्मा दुसऱ्या स्थानी राहिला. मोहितने 14 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या. मोहितने या दरम्यान एकदा  5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला.

2 / 6
गुजरात टायटन्स टीमचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने आपल्या फिरकीच्या करामतीवर 17 मॅचमध्ये एकूण 27 फलंदाजांचा काटा काढला. राशिद पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी राहिला.

3 / 6
कमालीची बाब म्हणजे मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा-राशिद खान यांच्यामध्ये फक्त 1 विकेट्चं अंतर होतं. फक्त 1 विकेटच्या अंतराने शमी पर्पल कॅप जिंकला. तर मोहित आणि राशिद या दोघांनी प्रत्येकी 27-27 विकेट्स घेतल्या. मात्र मोहितचा इकॉनॉमी रेट राशिदपेक्षा चांगला असल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. थोडक्यात काय,तर  मोहितने शमी आणि राशिदच्या तुलनेत 3 मॅत कमी खेळूनही आसपास तेवढ्याच विकेट्स घेतल्या आहेत. मोहितने आणखी 2 विकेट्स घेतल्या असत्या तर तो पर्पल कॅप विनर ठरला असता. म्हणजेच मोहितला 10 लाख रुपयेही मिळाले असते. शमी आणि मोहित यांच्यातील 2 विकेट्सचा फरक होता.

4 / 6
वय हा फक्त एक आकडा असतो, काहीही करण्याची जिद्द असली तर आपण करु शकतो, हे टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनिंग संघाचा सदस्य राहिलेल्या पीयूष चावला याने सिद्ध करुन दाखवलं. पीयूष या 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. पीयूषने 16 सामन्यांमध्ये 22 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पीयूष 22 विकेट्स घेत चौथ्या स्थानी राहिला.

5 / 6
तर राजस्थान रॉयल्स टीमचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने  14 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या. चहलने पाचवं स्थान पटकावलं.

6 / 6
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.