AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात Day-Night Test च्या पहिल्या डावात सव्वाशे धावा मुश्किल, आतापर्यंतची आकडेवारी IND-SL साठी धक्कादायक

मोहालीतला सामना जिंकल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आता बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेशी भिडणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली असून आता मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 8:23 PM
Share
मोहालीतला सामना जिंकल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आता बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेशी भिडणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली असून आता मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा डे-नाईट कसोटी सामना असेल आणि या स्टेडियमवर हा पहिला डे-नाईट कसोटी सामना असेल. (BCCI Photo)

1 / 5
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करू इच्छितो. सुरुवातीची काही षटकं जपून खेळल्यानंतर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल बनते. या स्टेडियममधील गेल्या पाच कसोटी सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या स्टेडियममधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 344 धावा इतकी आहे. यामुळे दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक असतील. या स्टेडियमवर भारताने अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. (File Pic)

2 / 5
भारतात खेळवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमधील पहिल्या डावाचे आकडे पाहिले तर ते दोन्ही संघांना घाबरवू शकतात. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावात अनुक्रमे 106 आणि 112 धावा झाल्या आहेत. (File Pic)

3 / 5
बांगलादेशने भारतात पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात यजमानांनी एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशला पहिल्या डावात 106 धावा करता आल्या आणि भारताने पहिला डाव 9 विकेट गमावून 347 धावांवर घोषित केला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. (File Pic)

4 / 5
भारतातील दुसरा डे-नाईट कसोटी सामना अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आला होता. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 112 धावांत आटोपला. भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला. (File Pic)

5 / 5
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.