AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : त्रिकुटासाठी 3 आठवडे निर्णायक, चमकले तर टीममध्ये जागा फिक्स!

India A vs Australia A 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलिया ए क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध इंडिया ए यांच्यात 16 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणारे 5 सामने (2 कसोटी आणि 3 एकदिवसीय) 3 खेळाडूंसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 07, 2025 | 6:37 PM
Share
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया ए  टीमची घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या एकूण 5 सामन्यांसाठी (4 दिवसीय 2 कसोटी सामने आणि 3 अनऑफशियल वनडे) संघ जाहीर करण्यात आला आहे. या 14 सदस्यीय संघातील 3 खेळाडूंच्या कामगिरीकडे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचं विशेष लक्ष असणार आहे. या दौऱ्यातील कामगिरीच्या आधारावर हे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघात जागा कायम करु  शकणार की नाहीत? हे ठरवलं जाऊ शकतं. (Photo Credit : Getty Images)

1 / 5
ऑस्ट्रेलियाच्या या तिन्ही खेळाडूंचं कसोटी पदार्पण झालं आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही टीम इंडिया विरुद्धच टेस्ट डेब्यू केलं आहे. मात्र त्यानंतर या तिघांना पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे या त्रिकुटासाठी भारत दौरा निर्णायक असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Getty Images)

2 / 5
सॅम कॉन्स्टास या 19 वर्षीय फलंदाजाने डिसेंबर 2024 मध्ये मेलबर्न कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.  सॅमने त्या मालिकेतील 4 डावांमध्ये एकूण 113 धाावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंट त्याच्या सारख्याच सक्षम ओपनरच्या शोधात आहे. सॅम वॉर्नरच्या जागेसाठी दावेदार आहे. मात्र सॅमला हा दावा आणखी मजबूत करण्यासाठी आणखी धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे  सॅम भारत दौऱ्यात कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  (Photo Credit : Getty Images)

3 / 5
नॅथन मॅकस्वीनी हा देखील ओपनर आहे. त्यामुळे वॉर्नरच्या जागेसाठी सॅम आणि नॅथन या दोघांमध्ये चुरस असल्याचं स्पष्ट आहे. नॅथनने टीम इंडिया विरुद्ध पर्थ कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. नॅथनने त्या मालिकेतील 6 डावांमध्ये 14.40 च्या सरासरीने 72 धावा केल्या. मात्र त्यानंतर नॅथनला संधी मिळाली नाही. त्यामुळे नॅथनसाठी भारत दौरा निर्णायक ठरु शकतो. (Photo Credit : Getty Images)

4 / 5
टॉड मर्फी याने 2023 मध्ये नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. टॉडने त्या मालिकेतील 4 कसोटी सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे मर्फीने तेव्हा भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला 4 वेला आऊट केलं होतं. मात्र टॉडला आतापर्यंत फक्त 7 कसोटी सामनेच खेळण्याची संधी मिळाली आहे. टॉडकडे  नॅथन लायनचा क्रिकेटमधील वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र टॉडला त्यासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे.  (Photo Credit : Getty Images)

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच