AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : प्लेऑफच्या एका जागेसाठी तीन संघात चुरस, कसं आहे समीकरण समजून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेतील 60 सामन्यांचा खेळ संपला आहे. यानंतर तीन संघ प्लेऑफमध्ये पोहोचले, तर चार संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. आता प्लेऑफची एकच जागा उरली आहे. तसेच या जागेसाठी तीन संघ दावेदार आहे. चला जाणून घेऊयात समीकरण

| Updated on: May 19, 2025 | 3:05 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. रविवारी पार पडलेल्या डबल हेडर सामन्यानंतर तीन संघांची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या जागेसाठी दावेदाऱ आहेत. चला जाणून घेऊयात समीकरण

1 / 5
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अजूनही दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने जिंकले तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला आणि पंजाब किंग्सविरुद्ध पराभव पत्करला तरीही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. कारण लखनौ सुपरजायंट्स मुंबई इंडियन्सला फक्त तेव्हाच मागे टाकू शकते जेव्हा त्यांनी पुढील तीन सामने जिंकेल आणि त्यांचा नेट रन रेट चांगला असेल. त्यामुळे मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला तर ते प्लेऑफसाठी जवळजवळ निश्चितच पात्र ठरतील. (PHOTO_ IPL/BCCI)

2 / 5
गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स  पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. तसेच लखनौ सुपरजायंट्सना त्यांच्या पुढील तीन सामन्यांपैकी एक सामना गमावला तर हे गणित सुटेल. यासह दिल्ली कॅपिटल्स एकूण 17 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. (PHOTO_ IPL/BCCI)

3 / 5
लखनौ सुपर जायंट्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. लखनौ सुपरजायंट्सना अजूनही तीन सामने खेळायचे आहेत. फक्त हे तीन सामने जिंकणे पुरेसे नाही. तर मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हरेल अशी अपेक्षा करावी लागेल. तसेच पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जिंकणं आवश्यक आहे. तरच लखनौ सुपरजायंट्स नेट रन रेटच्या आधारे पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचू शकेल. (PHOTO_ IPL/BCCI)

4 / 5
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स पैकी एका संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत.

5 / 5
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.