PHOTO : सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू अडकला लग्नबंधनात, SRH ने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत सीजनला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंनी सराव सुरु केला असून सनरायजर्स हैद्राबाद संघाता गोलंदाज नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

1/5
भारताचा युवा गोलंदाज आणि सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) एक मुख्य खेळाडू असणारा संदीप शर्मा (Sandeep Sharma) नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड ताशा सैथविकसोबत विवाह रचला आहे.(सौजन्य - Instagram)

2/5
संदीपच्या लग्नाची बातमी सनरायजर्स हैद्राबाद संघाने त्यांच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. यावेळी लग्नातील एक फोटोहो त्यांनी पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी संदीपला लग्नाबद्दल अभिनंदन देत आयुष्यभराच्या भागिदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (सौजन्य - Instagram)

3/5
संदीप शर्मा याला 2015 मध्ये भारतीय संघातून दोन टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. झिम्बाब्वे संघाविरुद्ध त्याने दोन सामने खेळत एक विकेटही मिळवला होता. पण त्यानंतर त्याला पुन्हा संघात संधी मिळाली नाही. त्यानंतर 2018 मध्ये हैद्राबाद संघाने 3 कोटी रुपयांना विकत घेतलं तेव्हापासून तो हैद्राबाद संघातून खेळत आहे.(सौजन्य - Instagram)

4/5
नव्या चेंडूने विकेट घेण्यात संदीप हैद्राबाद संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एकूण 39 विकेट्स घेतलेले आहेत. IPL 2021 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याने खास कामगिरी केलेली नसून केवळ तीनच विकेट्स घेतल्या आहेत.(सौजन्य - Instagram)

5/5
संदीप आणि त्याची गर्लफ्रेंड ताशा सैथविक हे दोघेही आपल्या सोशल मीडियावर एकमेंकासोबतचे फोटो पोस्ट करत असतात. ते विविध ठिकाणी फिरायला जात असतात त्या ठिकाणचे बरेच फोटो त्यांच्या सोशल मीडियावर आहेत. (सौजन्य - Instagram)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI