PHOTO | अक्षर पटेल आणि हसन अली आमनेसामने, 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा 5 विकेट्स कोणाच्या नावावर?

टीम इंडियाच्या (Team India) अक्षर पटेल (Axar Patel) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) हसन अलीने (Hasan Ali) 2021 मध्ये कसोटीत सर्वात कमी डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

1/5
team india, indian cricket team, axar patel, hasan ali, pakistan, 5 wickets, test cricket, bcci, pcb,
पाकिस्तान, टीम इंडियाचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी. राजकीय तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. मात्र त्यानंतरही या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांची कामगिरीवरुन चर्चा असते. पाकिस्तानला धमाकेदार गोलंदाजांची परंपरा आहे. पाकिस्तानात तोडीसतोड गोलंदाज आहेत. मात्र यांनाही पुरून उरणारे गोलंदाज भारताकडे आहेत. 2021 या वर्षात पाकिस्तानच्या तुलनेत कसोटीमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याच्या बाबतीत भारत वरचढ राहिला आहे.
2/5
team india, indian cricket team, axar patel, hasan ali, pakistan, 5 wickets, test cricket, bcci, pcb,
टीम इंडियाकडून (Axar Patel) अक्षर पटेलने 2021 मध्ये कसोटीत कमी डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
3/5
team india, indian cricket team, axar patel, hasan ali, pakistan, 5 wickets, test cricket, bcci, pcb,
अक्षरने 2021मध्ये आतापर्यंत 6 डावात 4 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर पाकिस्तानकडून (Hasan Ali) हसन अलीने 7 डावात 4 वेळा 5 विकेट्स पटकावल्या आहेत.
4/5
team india, indian cricket team, axar patel, hasan ali, pakistan, 5 wickets, test cricket, bcci, pcb,
या दोघांनंतर एका डावात सर्वाधिक वेळा रवीचंद्रन अश्विनने 5 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 10 डावांमध्ये 3 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
5/5
team india, indian cricket team, axar patel, hasan ali, pakistan, 5 wickets, test cricket, bcci, pcb,
क्रिकेट विश्वात इतर कोणाही गोलंदाजांच्या तुलनेत अक्षर आणि हसनने या 2021 मध्ये सर्वाधिक 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची किमया केली आहे.