Usain Bolt Twin Babies | वेगाचा बादशाह उसेन बोल्टला जुळी मुलं, एकाचं नाव थंडर बोल्ट, दुसऱ्याचं काय?

जगातील सर्वांत वेगवान धावपटू उसेन बोल्टने काही दिवसांपूर्वीच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्यांची नावं त्याने अगदी आगळी-वेगळी ठेवल्याने या नावांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

1/4
जगातील सर्वांत वेगवान धावपटू म्हटलं तर एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उसेन बोल्ट (Usain Bolt). दरम्यान हा वेगाचा बादशाह नुकताच दोन जुळ्या मुलांचा बाबा झाला असून त्याने त्यांच्या मुलांची ठेवलेली नाव अगदीच वेगळी आहेत.(Usain Bolt Wife Kasi Bennett Gave Birth to Twins names of Bolts Son went Viral on Social Media)
2/4
बोल्टची साथीदार कॅसी बेनेट हीने नुकताच त्यांच्या नवजात जुळ्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यात त्यांची मुलगी ओलिंपिया देखील आहे.
3/4
या पोस्टला कॅसी हिने 'फादर्स डे च्या शुभेच्छा. तुम्ही परिवारातील महत्त्वाचे सदस्य असून तुम्ही सर्वांत चांगले वडिल आहात.' असे कॅप्शन दिले असून सोबतच जुळ्या मुलांची नावं देखील लिहिली आहेत. त्यांनी एका मुलाचे नाव थंडर बोल्ट आणि दुसऱ्याचे सेंट लियो बोल्ट अशी ठेवली आहेत.
4/4
bolt couple
बोल्ट आणि कॅसी बऱ्याच काळापासून एकमेंकाना डेट करत असल्याचं बोल्टने 2016 मध्ये टेलीग्राफ या वृत्तसंस्थेला सांगितलं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI