Photo : बॉलिवूड डेब्यूपूर्वीच ‘या’ चित्रपटांमध्ये झळकले स्टारकिड्स, वाचा ही खास माहिती

बॉलिवूड डेब्यूपूर्वी या स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये काम केलंय. (Starkids starring in these movies before Bollywood debut, read this special info)

  • Publish Date - 11:32 am, Fri, 7 May 21
1/6
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ‘कर्मा’ या शॉर्ट फिल्ममुळे चर्चेत आहे. 2004 मध्ये बनलेली ही शॉर्टफिल्म नुकतंच प्रदर्शित झाली आहे. यापूर्वी काही कारणास्तव ही शॉर्टफिल्म रिलीज होऊ शकली नव्हती.

2/6
ही शॉर्टफिल्म रणबीरची डेब्यू फिल्म सावरियापूर्वी तयार करण्यात आला होता. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी इतर प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे.

3/6
आर्यन खान : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र एका चित्रपटासाठी त्याचा व्हॉईसओव्हर देण्यात आला आहे. ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी त्यानं सिंबा (Baby Lion) आवाज दिला होता. प्रेक्षकांना त्याचा आवाज चांगलाच आवडला. शाहरुखनं या चित्रपटात मुफ्सा (Father of Lion) साठी आवाज दिला होता.

4/6
शनाया कपूर : संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर आता चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. ती आधीपासून करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊस धर्म कॉर्नरस्टोन एजन्सीमध्ये सामील झाली आहे. जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शनाया कपूरनं काम केलं. याशिवाय ती नेटफ्लिक्सच्या वेब सीरिज फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड विव्हिसमध्ये दिसली आहे.

5/6
रेने सेन : सुष्मिता सेनची मोठी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली आहे. सुट्टाबाजी या शॉर्ट फिल्ममध्ये ती मुख्य भूमिकेत होती. या शॉर्टफिल्मचं कबीर खुराना यांनी दिग्दर्शन केलं. यात राहुल वोहरा आणि कोमल छाब्रिया मुख्य भूमिकेत आहेत.

6/6
सुहाना खान : शाहरुख खानची मुलगी सुहाना खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे. ती सध्या थिएटर करत आहे, अभिनय शिकत आहे. दरम्यान, तिने आपल्या वडिलांच्या ‘झिरो’ या चित्रपटातही काम केले होतं. सुहाना झिरोमध्ये सहाय्यक दिग्दर्शक होती. शाहरुखनं स्वतः हा खुलासा केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI