Marathi News » Photo gallery » The first girl from Kapuskhed in Sangli entered the armed border force; The villagers gave a warm welcome
Photo Gallery | सांगलीच्या कापूसखेडमधील पहिली कन्या सशस्त्र सीमा बलात दाखल ; गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत
स्रेहल खराडेने राजस्थान येथे एस.एस.बी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. प्रशिक्षनानंतर प्रथमच गावात आल्यानंतर तीची गावातून जंगी मिरवणूक काढत ,उत्साहाने स्वागत करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावची कन्या स्रेहल कृष्णा खराडेची बिहार येथे सशस्त्र सीमा बल (एस.एस.बी) दलात निवड झाली आहे. कापूसखेड तसेच पंचक्रोशीतील पहिली महिला फौजी होण्याचा मान तिने मिळवला आहे.
1 / 5
सैन्यात भरती होण्यापूर्वी स्रेहलने अभ्यासाबरोबच गावातील मैदानावर शारीरिक व्यायाम केला. त्याच दरम्यान निघालेल्या सैन्य भरतीची परीक्षा देत त्यात तिने यश मिळवले आहे.
2 / 5
स्रेहलने अत्यंत खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आई -वडिलांची मुलीने सैन्यात जाण्याची इच्छा तिने पूर्ण करून दाखवली. तिचे वडील कृष्णा खराडे शेतकरी आहेत. तर आई संगिता खराडे गृहिणी आहेत.
3 / 5
स्रेहल खराडेने राजस्थान येथे एस.एस.बी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. प्रशिक्षनानंतर प्रथमच गावात आल्यानंतर तीची गावातून जंगी मिरवणूक काढत ,उत्साहाने स्वागत करण्यात आले.
4 / 5
सशस्त्र सीमा बलामध्ये निवड झालेली ती गावातील पहिलीच मुलगी आहे.तिने मिळवलेल्या या यशामुळे गावासह, पंचक्रोशीतील मुलींना भारतीय लष्करात करिअर करण्याची प्रेरणा मिळली आहे.