AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : शत्रूच काय? चिटपाखरंही फिरकू शकत नाही… शिवाजी महाराजांचे हे किल्ले माहीत असायलाच हवे

छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील शूर योद्ध्यांपैकी एक होते. अत्यंत सामान्य लोकांना हाताशी धरून त्यांनी आपली फौज निर्माण केली. कमी मनुष्यबळाच्या जोरावर आपल्या बुद्धीचातुर्याने त्यांनी शत्रूला पाणी पाजलं. शिवाजी महाराजच काय पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं नाव ऐकूनही मुघल सल्तनतला कापरं भरायचं. इतका शिवाजी महाराजांचा दरारा होता. त्यांच्या किल्ल्यांच्या तटबंदीत तर शत्रूच काय? चिटपाखरांनाही परवानगी शिवाय येता येत नव्हतं. शिवाजी महाराजांचे हे किल्ले अधिक रहस्यमय होते. अभेद्य होते. आणि वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूनाही होते. या किल्ल्यांची माहिती असायलाच हवी.

| Updated on: Aug 26, 2024 | 1:03 PM
Share
 रायगड -  रायगड किल्ला शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. शिवाजी महाराजांच्या काळात रायगड ही राजधानी होती. महाडच्या डोंगरावर हा किल्ला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही रायगडावरच झाला होता. यावरून या किल्ल्याचं महत्त्व अधोरेखित होतं. या किल्ल्यावर जाण्यासाठी 1737 पायऱ्या चढाव्या लागतात. तुम्ही रोपवेची मदत घेऊन जाऊ शकता. त्यामुळे अवघ्या 20 मिनिटात किल्ल्यावर पोहोचता येते.

1 / 5
शिवनेरी -  शिवनेरी किल्ल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पुण्यातील जुन्नरजवळ शिवनेरी किल्ला आहे. किल्ल्याच्या आत आई शिवाईचं मंदिर आहे. आई शिवाईच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं. या किल्ल्यावर गो़ड पाण्याचे दोन स्त्रोत आहेत. त्याला गंगा जमुना म्हटलं जातं. या ठिकाणी वर्षभर पाणी असतं. इथलं पाणी कधी आटत नसल्याचं सांगितलं जातं. किल्ल्याच्या जवळ अनेक गुंफाही आहेत. पुणे स्टेशन किल्ल्यापासून जवळ आहे.

2 / 5
सिंधुदुर्ग -   देशातील सर्वात चांगल्या सागरी दुर्गांपैकी सिंधुदुर्ग एक आहे. शिवाजी महाराजांनी कोकण तटावर हा किल्ला उभारला होता. हा किल्ला बनवण्यसाठी तीन वर्ष लागले होते. हा किल्ला 48 एकरावर विस्तारलेला आहे. किल्ल्यात तीन जलाशय आहेत. हे जलाशय कधीच सुखत नाहीत. उन्हाळ्यात गावातील जलाशय आटतात. पण हा जलशय कधीच आटत नाही. कुडाळ रेल्वे स्थानकापासून हा किल्ला जवळ आहे. शिवाजी महाराजांच्या नौदलाचं प्रतिबिंब म्हणूनही या किल्ल्याकडे पाहिलं जातं.

3 / 5
प्रतापगड -  साताऱ्यात प्रतापगड किल्ला आहे. नावाप्रमाणेच या किल्ल्यावर मोठमोठे प्रताप घडलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. हा किल्ला 1665 मध्ये बनवण्यात आला होता. वीर दासगांव रेल्वे स्थानकापासून हा किल्ला जवळ आहे. महाबळेश्वरपासून अवघ्या 24 किलोमीटरवर हा किल्ला आहे.

4 / 5
लोहगड -  लोहगड हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. पुण्यापासून 52 किलोमीटरवर लोनावळा येथे हा किल्ला आहे. सुरतवरून आणलेला माल ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. या किल्ल्याच्या समोरच्या डोंगरात मोठमोठ्या गुंफा आणि बौद्ध लेण्या आहेत. बौद्ध भिक्षूकांचं या लेण्यांमध्ये वास्तव होतं. या लेण्यांमध्ये बुद्धाच्या मूर्त्या आहेत.

5 / 5
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.