AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत 2BHK चे भाडं किती? डिपॉझिट आणि ब्रोकरेजचं गणित काय? जाणून घ्या

अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांसाठी 2BHK अपार्टमेंट भाड्याने घेणे ही पहिली पायरी आहे. सुरुवातीला डिपॉझिट, आगाऊ भाडे असे अधिक खर्च लागतात. बहुतेक अपार्टमेंट्समध्ये डिशवॉशर, वॉशिंग मशीनसह जिम, पूलसारख्या सुविधा मिळतात,

| Updated on: Dec 16, 2025 | 4:56 PM
Share
अमेरिकेत आपले घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. पण तिथे प्रत्यक्ष राहण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागतात. हल्ली बहुतेक भारतीय हे कामानिमित्त, शिक्षणानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

1 / 8
अमेरिकेत स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी घराचे भाडे हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न असतो. जर तुम्हाला अमेरिकेत दोन बेडरूमच्या (2BHK) अपार्टमेंट भाड्याने घ्यायचे असेल तर ते शहर, राज्य आणि प्रदेशानुसार वेगवेगळे असते.

2 / 8
अमेरिकेत सरासरी दोन बेडरूमच्या अपार्टमेंटचे एक महिन्याचे भाडे १,७०० ते १,९०० युएस डॉलर इतके आहे. भारतीय चलनानुसार हे भाडे साधारण १.४ लाख ते १.६ लाख इतके आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी हे भाडे जास्त असते. तर लहान आणि मध्यम आकाराच्या शहरांमध्ये २ बीएचके अपार्टमेंट खूपच स्वस्त उपलब्ध  होतात.

3 / 8
अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी दरमहा US २,३०० डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २ लाख १० हजार भाडे द्यावे लागते.

4 / 8
अमेरिकेतील अपार्टमेंट भाड्याने घेताना सुरुवातीला मोठी रक्कम भरावी लागते. त्यामुळे पहिल्या महिन्याचा एकूण खर्च भाड्यापेक्षा खूप जास्त असू शकतो. भाड्यासोबत तुम्हाला डिपॉझिटहे भरावे लागते.

5 / 8
त्यासोबतच पहिल्या महिन्याचे भाडे आगाऊ देणे बंधनकारक असते. काही शहरांमध्ये, एजंट किंवा ब्रोकरमार्फत अपार्टमेंट घेतल्यास हे शुल्क देखील लागू होते. अमेरिकेतील अपार्टमेंट्सची रचना आणि सोयी सुविधा भारतातल्या अपार्टमेंटपेक्षा थोड्या वेगळ्या असतात.

6 / 8
तसेच या ठिकाणी ओपन किचनची संकल्पना अधिक लोकप्रिय आहे. या ठिकाणी बहुतांश अपार्टमेंटमध्ये डिशवॉशर, मायक्रोवेव्ह, मिक्सर, रेफ्रिजरेटर, ओव्हन, वॉशिंग मशीन आणि ड्रायर यांसारखी आवश्यक उपकरणे असतात. तसेच डायनिंग टेबल, ड्रॉइंग रूमचे फर्निचर बनवलेले असते.

7 / 8
याव्यतिरिक्त, अनेक अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये जिम, स्विमिंग पूल आणि कम्युनिटी हॉलसारख्या अतिरिक्त सुविधाही उपलब्ध असतात. त्यामुळे अमेरिकेत अपार्टमेंट भाड्याने घेताना केवळ भाडेच नव्हे, तर या सर्व सुविधाही दिल्या जातात.

8 / 8
Follow Us
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...