PHOTO | बंगालमध्ये कडवट राजकारणात मिठाईवाल्याची साखरपेरणी; मोदी, ममता मिठाईची जमके विक्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारखी हुबेहुब मिठाई तयार करुन एक माणूस मिठाई विकतोय. (mamata banerjee narendra modi sweet)

1/5
देशात एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या सर्व राज्यांमध्ये सध्या  सर्वात जास्त पश्चिम बंगाल या राज्याची चर्चा आहे. सध्याच्या निवडणुकीत नेत्यांच्या ताफ्यावर हल्ले, सभेत हिंसेच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सर्वात कडवट, विखारी आणि टोकाचे राजकारण म्हणून पश्चिम बंगालकडे पाहिलं जातंय. मात्र, या पार्श्वभूमीवर बंगालमधील एक मिठाईवाला संपूर्ण राज्यात साखऱपेरणी करण्याचा प्रयत्न करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सारखी हुबेहुब मिठाई तयार करुन हा माणूस मिठाई विकतोय.

2/5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्या नावाची मिठाई तयार केली जात आहे. या मिठाईला लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. अशा प्रकराची मिठाई लोक चवीने खात आहेत.

3/5
पश्चिम बंगालमधील बालाराम मल्लिक आणि राधरमण मल्लिक यांनी 1885 साली कोलकात्यामध्ये एक मिठाईचे दुकान सुरु केले होते. सध्या या मिठाईच्या दुकानाचा कारभार सुदीप मल्लिल सांभाळतात. असं म्हणतात की मल्लीक यांची मिठाई पूर्ण पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या ते मोदी आणि ममता यांच्या नावाने मिठाई करुन विकत आहेत.

4/5
याविषयी सुदीप मल्लिक यांनी अधिकची माहिती सांगितली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. राजकीय वातावरण गरम आहे. त्यामुळे या काळात सोशल मीडियावर नेमकं काय ट्रेंडिग आहे यावर आम्ही अभ्यास करतो. त्यानंतर याच विषयाला घेऊन आम्ही नवनवीन डिझाईनच्या मिठाई तयार करतो. सध्या आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या चिन्हाच्या तसेच प्रसिद्ध राजकीय व्यक्तींच्या मिठाई तयार करतो आहोत. खेला होबे, जय श्री राम अशा प्रकारचे नारे असलेल्या मिठाईसुद्धा आम्ही तयार करतो आहोत. या मिठाईला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंदी मळते आहे. असे मल्लिक यांनी सांगितलं.

5/5
तसेच पुढे बोलताना आम्ही ममता तसेच मोदी यांच्या यांच्या फोटोंना बघूनसुद्धा हुबेहुब त्यांच्यासारखीच मिठाई तयार केली आहे. याच मिठाईची चर्चा सध्या संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI