मुंगूस आणि साप हे एकमेकांचे शत्रू आहेत, हे जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. साप दिसताच मुंगूस त्याच्यावर तुटून पडते. विशेष म्हणजे सापाचा जीव जाईपर्यंत मुंगूस सापाचा पिच्छा सोडत नाही.
1 / 6
कोब्रा ही सापाची सर्वाधिक विषारी प्रजाती आहे, असे मानले जाते. या सापाने एकदा चावा घेतला की मृत्यू अटळ असतो, असे बोलले जाते. मात्र मुंगूस हा प्राणी किंग कोब्राशीदेखील दोन हात करतो. कोब्रा जातीच्या सापाशी लढाई करून मुंगूस त्याला मारून टाकतं.
2 / 6
किंग कोब्राच्या विषाचा असर होऊ नये म्हणून मुंगूस एक खास ट्रिकचा वापर करतं. सापाने हल्ला करताच मुंगूस अगदीच चपळाईने उडी मारून आणि स्वत:ला वाचवतं. हीच ट्रिक वापरून मुंगूस सापाला पराभूत करते.
3 / 6
विशेष म्हणजे सापाने केलेला हल्ला चुकवून मुंगूस हवेत उडी घेतं. खाली जमिनीवर येताना मुंगूस एका क्षणात सापाच्या डोक्याचा चावा घेते आणि स्वत:चाही बचाव करते.
4 / 6
डोक्याचा चावा घेतल्यानंतर कालांतराने सापाचा मृ्त्यू होतो आणि मुंगूस विजयी होते. पण यातही सापाने आक्रमक होत वारंवार मुंगूसाला चावा घेतल्यास यात मुंगूसाचा विजय होऊ शकतो.
5 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)