भारतातील ज्योती मल्होत्रा या तरुणीला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या ही तरुणी पोलीस कोठडीत आहे.
1 / 6
पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. याच चौकशीतून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर लाखो लोक फॉलोअर्स असणारी ही ज्योती मल्होत्रा काही पाकिस्तानी अधिकारी तसेच पाकिस्तानी लोकांच्या थेट संपर्कात होती.
2 / 6
पाकिस्तामधील अनेक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केल्या आहेत. याच पोस्टमध्ये तिच्यासोबत एक पाकिस्तानी तरुणी दिसत आहे. हीच तरुणी नेमकी कोण आहे, असे विचारले जात आहे.
3 / 6
ज्योतीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमधील तरुणीचे नाव हीना असे आहे. ही पाकिस्तानमधील पत्रकार आहे. विशेष म्हणजे ज्योतीने याच हीनाला इन्स्टाग्रामच्या व्हिडीओमध्ये टॅगही केलं आहे. व्हिडीओत तिचा इन्स्टा आयडी स्पष्टपणे दिसतोय.
4 / 6
ज्योतीने पोस्ट केलेला व्हिडीओ साधारण 10 आठवड्यांपूर्वीचा आहे. मात्र ज्योतीला अटक झाल्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
5 / 6
ज्योती मल्होत्राचे ट्रॅव्हल विथ गो नावाचे यूट्यूब चॅनेल असून या चॅनेलचे एकूण 3.78 लाख सबस्क्रायबर्स आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 1.33 लाख तर फेसबुकवर 3.21 लाख फोलोअर्स आहेत.