तुम्हाला कधी मिळणार नवं मतदान कार्ड? काय आहे संपूर्ण प्रक्रिया, वाचा सविस्तर

आज 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन डिजिटल मतदार ओळखपत्र सुरू करून साजरा करणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला मतदार कार्डची हार्ड कॉपी ठेवण्याची गरज भासणार नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:46 AM, 25 Jan 2021
1/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
निवडणूक आयोग आज 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन डिजिटल मतदार ओळखपत्र सुरू करून साजरा करणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला मतदार कार्डची हार्ड कॉपी ठेवण्याची गरज भासणार नाही. हे एक डिजिटल कार्ड असणार आहे. जे डिजिटल लॉकरसारख्या माध्यमांद्वारे सुरक्षित ठेवलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) फॉरमॅटमध्ये प्रिंट केलं जाऊ शकते. इलेक्ट्रॉनिक इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड (e-EPIC) अ‍ॅप लॉन्च करण्यात येणार आहेत. चला जाणून घेऊया डिजिटल मतदार ओळखपत्राशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी.
2/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
1. डिजिटल मतदार ओळखपत्र पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असणार असून नवीन मतदारांना त्यांच्या मतदार ओळखपत्राची हार्ड कॉपीदेखील मिळेल.
3/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
2. 25 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान पहिल्या टप्प्यात फक्त नवीन मतदारांना डिजिटल मतदार ओळखपत्र देण्यात येणार आहे
4/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
3. 1 फेब्रुवारीपासून दुसरा टप्पा सुरू होईल. यामध्ये ज्या लोकांचा फोन नंबर निवडणूक आयोगाशी जोडला आहे त्यांना डिजिटल ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.
5/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
4. ज्या मतदारांचा फोन नंबर लिंक नाही, त्यांना डिजिटल ओळखपत्रासाठी नंबर लिंक करणं आवश्यक आहे.
6/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
5. या कार्डाद्वारे अनुक्रमांक, भाग क्रमांक आणि सुरक्षित क्यूआर कोडही देण्यात येणार आहे.
7/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
6. डिजिटल कार्ड कार्डमुळे तुम्हाला छापील कार्ड घेऊन फिरण्याची गरज नाही.
8/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
7. डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ वर लॉग इन करावं लागेल. यानंतर, डाउनलोड ई-ईपीआयसीच्या पर्यायावर क्लिक करा. लक्षात असुद्या 25 जानेवारी रोजी सकाळी 11.14 वाजेपासून डाउनलोड सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
9/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
8. डिजिटल मतदार ओळखपत्रांचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे वेळेची बचत.
10/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
9. नवीन मतदार कार्ड बनवण्यासाठी किंवा जुन्या कार्डे बदलण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही फोनवर इलेक्ट्रॉनिक इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी अॅप (e-EPIC) डाउनलोड करुन डिजिटल मतदार ओळखपत्र बनवू शकता.
11/11
digital voter card, download voter id, voter id online, election commission, Ravishankar Prasad
10. जर तुमचं मतदार कार्ड हरवलं असेल तर या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही डुप्लिकेट मतदार ओळखपत्र मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 25 रुपये फी भरावी लागणार आहे.