AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात महागडे शौचालय कुठे आहे? किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

जगातील सर्वात महागडे शौचालय पृथ्वीवर नसून नासाच्या एंडेव्हर स्पेस शटलमध्ये आहे, ज्याची किंमत सुमारे २६० कोटी रुपये आहे. शून्य गुरुत्वाकर्षणात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान असल्याने हे खास तंत्रज्ञानाने बनवले आहे.

| Updated on: Nov 19, 2025 | 7:53 PM
Share
शौचालय ही केवळ एक गरज नसून आरोग्य आणि आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण जगातील सर्वात महागडे शौचालय नेमकं कुठे आहे? त्याची किंमत किती आहे? याची तुम्हाला माहितीये का? नाही ना....  आज आपण याबद्दल जाणून घेऊया.

1 / 8
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील सर्वात महागडे शौचालय पृथ्वीवर नाही, तर नासाच्या एंडेव्हर स्पेस शटलमध्ये अंतराळवीरांसाठी बसवण्यात आले होते. या हायटेक स्पेस टॉयलेटची किंमत सुमारे २.६ अब्ज (२६० कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते. या किंमतीत तुम्हाला भारतात दोन ते तीन आलिशान बंगले सहज बांधता येतील.

2 / 8
साधारणपणे, आपण महागड्या गाड्या, गॅझेट्स किंवा दागिन्यांबद्दल ऐकतो. पण जेव्हा कोट्यवधी नव्हे, तर अब्जावधी रुपये एका शौचालयासाठी खर्च होतात, तेव्हा त्याची कारणे खूप खास असतात. पृथ्वीवर शौचालय फ्लश करण्यासाठी गुरुत्वाकर्षण मदत करते. पण अवकाशातील शून्य गुरुत्वाकर्षण असते. या वातावरणात मानवी शरीरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याच्या प्रत्येक कणावर वैज्ञानिक पद्धतीने नियंत्रण ठेवावे लागते. कोणतीही वस्तू तरंगू नये किंवा अंतराळवीरांच्या आरोग्याला धोका पोहोचवू नये म्हणून खास तंत्रज्ञान आवश्यक असते.

3 / 8
नासाने १९८८ ते १९९२ या काळात अंतराळवीरांच्या वापरासाठी हे खास शौचालय एंडेव्हर स्पेस शटलमध्ये बसवले होते. अवकाश शौचालये सामान्य शौचालयासारखी दिसत नाहीत किंवा ते सामान्यासारखे कार्य देखील करत नाही. अंतराळात कचरा बाहेर काढण्यासाठी आणि तो एका वेगळ्या चेंबरमध्ये जमा करण्यासाठी यात शक्तिशाली 'सक्शन सिस्टम'चा वापर केला जातो.

4 / 8
या शौचालयामध्ये केवळ कचरा व्यवस्थापनाचे नव्हे, तर हवेचा दाब (Air Pressure), तापमान (Temperature) आणि बॅक्टेरिया नियंत्रण (Bacteria Control) यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रणालींचाही समावेश असतो.

5 / 8
नासाच्या शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे केलेले संशोधन आणि अनेक प्रयोग यामागे आहेत. शून्य गुरुत्वाकर्षणात काम करणारी प्रणाली विकसित करणे हे एक मोठे वैज्ञानिक आव्हान होते. यात वापरलेले तांत्रिक उपकरणे आणि अवकाश-सुरक्षित (Space-Safe) साहित्य सामान्य साहित्यापेक्षा खूप महाग आणि विशेष असतात.

6 / 8
यात गळती, दोष किंवा बॅक्टेरियाचा प्रसार रोखणारे उच्च दर्जाचे सुरक्षा तंत्रज्ञान समाविष्ट आहे. कारण अवकाशात झालेली एक छोटीशी चूक देखील अंतराळवीरांसाठी जीवघेणी ठरू शकते.

7 / 8
जगातील सर्वात महागडे शौचालय हे केवळ एक उपयुक्त साधन नाही, तर अवघड वैज्ञानिक आणि तांत्रिक आव्हानांवर मात करून मानवाने अवकाशात मिळवलेल्या प्रगतीचे प्रतीक आहे.

8 / 8
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.