AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJPने विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं भांडवल केलं; आंदोलन संपताच जंगी पार्टीचा Video थेट बड्या नेत्यानेच शेअर केला

सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलन संपताच अभिजीत दीपके पासून सौरव दास जंगी पार्टी करताना दिसत आहेत.

CJPने विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं भांडवल केलं; आंदोलन संपताच जंगी पार्टीचा Video थेट बड्या नेत्यानेच शेअर केला
Abhijit Dipke Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 1:13 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशात कॉकरोच जनता पार्टी ही चांगलीच चर्चेत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या पार्टीने केली होती. त्यासाठी त्यांनी लाखो विद्यार्थ्यांसोबत मिळून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केली. सीजेपीच्या सर्व सदस्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा उचलून धरला होता. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. आता एका बड्या नेत्याने सीजेपीचा इनसाईट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

काय आहे व्हिडीओ?

दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते तजिंदर बग्गा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलन संपल्यानंतर सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके पासून पार्टीचे इतर सदस्य सौरव दास वैगरे जंगी पार्टी करताना दिसत आहेत. सर्वजण एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

Abhijeet Dipke Net worth: अभिजीत दीपकेची एकूण संपत्ती किती? कमाईचा स्त्रोत काय?

“मृत्यूंचा वापर केवळ राजकारण आणि प्रसिद्धीसाठी”

तजिंदर बग्गा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर सीजेपीचा पार्टी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, मला वाटले होते की CJP त्या २१ विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे शोक करत आहे. पण प्रत्यक्षात, ते त्या मृत्यूंचा वापर केवळ निषेध, राजकारण आणि प्रसिद्धीसाठी करत होते. आता ते पार्ट्या करण्यात मग्न आहेत या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच संमिश्र प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळत आहे. एका यूजरने, ‘आताची पिढी.. ते सर्व काही उघडपणे करत आहेत. पण फेकू आणि डाकू यांना आता काळजी वाटेल’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, एवढं सगळं झाल्यानंतर पार्टी तो बनती है ना असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, इतक्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी आनंद साजरा केला पाहिजे आणि पुढच्या गोष्टीसाठी सज्ज झाले पाहिजे!! या पार्टीला उपस्थित असलेल्या सर्वांची ओळख पटली आहे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असे म्हटले आहे.

Follow Us
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?