पंकजा मुंडे वि. धनंजय मुंडे, क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने, बीडमध्ये रंगतदार लढती ठरल्या

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे, तर संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध जयदत्त क्षीरसागर असा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

पंकजा मुंडे वि. धनंजय मुंडे, क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने, बीडमध्ये रंगतदार लढती ठरल्या
अनिश बेंद्रे

|

Sep 18, 2019 | 2:35 PM

बीड : विधानसभा निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने हातमिळवणी करत आघाडीची घोषणा केल्यानंतर बीड दौऱ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवारही जाहीर करुन टाकले आहेत. त्यामुळे विधानसभेला परळी मतदारसंघात (Beed Vidhansabha Big Fight) भाजप मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे, तर क्षीरसागर काका-पुतण्या आमने सामने आल्यामुळे हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

परळीच्या मैदानात 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी (Beed Vidhansabha Big Fight) झालेल्या रंगतदार सामन्याची पुनरावृत्ती यंदाही घडणार आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भावंडांमध्ये यावेळीही लढत होणार आहे. पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये नेहमीच वाक्-युद्ध रंगताना दिसतं. आता निवडणुकीच्या प्रचारात ते शिगेला पोहचताना दिसेल.

बीडमधून शरद पवारांनी राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले संदीप यांचे काका आणि मंत्री जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे बीडच्या पीचवर काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

BREAKING – राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, शरद पवारांकडून उमेदवार घोषित

एकंदरीतच बीड जिल्ह्यामधल्या या दोन लढती (Beed Vidhansabha Big Fight) नात्यागोत्यातील असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रचाराच्या धुरळ्यात हायव्होल्टेज ड्रामा रंगणार यात शंका नाही.

गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, केज मतदारसंघातून नमिता मुंदडा, तर माजलगावमधून प्रकाश सोळंके असे राष्ट्रवादीचे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असं शरद पवारांनी सांगितलं. अन्य पक्षाच्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळाल्यास रंगतदार लढती होण्याची चिन्हं आहेत.

राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय.

ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची आहे, मी गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्याला विजयी करण्याचं भावनिक आवाहन केलं होतं.

बीडमधील संभाव्य रंगतदार लढती

  • बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) VS संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
  • परळी – पंकजा मुंडे (भाजप) VS धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
  • गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) VS विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
  • माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) VS प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
  • केज – संगिता ठोंबरे (भाजप) VS नमिता मुंदडा (राष्ट्रवादी)
  • आष्टी – भीमराव धोंडे (भाजप) VS अद्याप उमेदवार ठरलेला नाही

2014 मध्ये निवडून आलेले विद्यमान आमदार

गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) आष्टी – भीमराव धोंडे (भाजप) केज – संगिता ठोंबरे (भाजप) परळी – पंकजा मुंडे (भाजप)

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे, पंकजाताई सोडा, तुम्हाला आमचे सुरेश धसच पुरेसे आहेत : मुख्यमंत्री

… तर थेट गुन्हे दाखल करा, पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

धनंजय मुंडेंचं एकच ध्येय, खोटं बोल पण रेटून बोल : पंकजा मुंडे

भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी पंकजांनी मागवली, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

मी मुंडे साहेबांचा वारसदार नाही, तो वारसा तुम्हालाच लखलाभ, धनंजय मुंडेंचं पंकजांना उत्तर

तोडपाणी करणारे धनंजय हे गोपीनाथ मुंडेंचे वारस कसे, पंकजांचा हल्ला

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें