Kapildev Kamat | नितीश कुमारांच्या निकटवर्तीय मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

पंचायती राज मंत्री आणि जनता दल युनायटेड (JDU) चे नेते कपिलदेव कामत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.(Bihar Minister Kapildev Kamat Death due to corona)

Kapildev Kamat | नितीश कुमारांच्या निकटवर्तीय मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमधील पंचायती राज मंत्री आणि जनता दल युनायटेड (JDU) चे नेते कपिलदेव कामत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुरुवारी (15 ऑक्टोबर) रात्री उशिरा पाटण्यातील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला. (Bihar Minister Kapildev Kamat Death due to corona)

कपिलदेव कामत यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कित्येक दिवसांपासून किडनीत काही त्रास होत होता. त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच बिहारचे मंत्री आणि प्राणपूरचे भाजप आमदार विनोद सिंह यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

“कपिलदेव कामत हे मातीशी जोडलेले नेते होते. ते मंत्रिमंडळाती माझे सहकारी होती. ते कुशल प्रशासक आणि लोकप्रिय नेते होते. त्यांच्या अकास्मित निधनामुळे मला प्रचंड दुख झालं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली.

कपिलदेव कामत मधुबनी जिल्ह्यातील बाबूबरही मतदारसंघातून संयुक्त जनता दलाचे (JDU) आमदार होते. तसेच बिहार सरकारमध्ये त्यांच्यावर पंचायती राज मंत्रालयाची जबाबदारी होती. कामत हे नितीशकुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते दहा वर्ष मंत्री असून गेल्या 40 वर्षापासून राजकारणात सक्रीय होते.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या प्रकृतीचा विचार करता जेडीयूने त्यांची सून मीना कामत यांना मधुबनी जागेसाठी उमेदवारी दिली आहे.

बिहार निवडणूक

कोरोनाच्या संकटात देशातील ही पहिली निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त)आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (NDA) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6, सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015च्या विधानसभा निडणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. परंतु आता महाआघाडीचा घटक पक्ष जेडीयू भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू मुख्य चेहरा आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे.(Bihar Minister Kapildev Kamat Death due to corona)

संबंधित बातम्या : 

Bihar Election | शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ‘बिस्कीट’, आम्हाला ते चिन्ह नको, सेनेची भूमिका

Published On - 9:17 am, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI