Eknath Shinde : शिंदेंकडे 37 पेक्षा जास्त आमदार, सूत्रांची माहिती, आजच राज्यपालांना भेटणार? ठाकरेंच्या अडचणीत वाढ

एकनाथ शिंदेंना दोन तृतीयांश शिवसेना आमदार फोडण्यात यश आलंय. अशी सूत्रांची माहिती आहे.

Eknath Shinde : शिंदेंकडे 37 पेक्षा जास्त आमदार, सूत्रांची माहिती, आजच राज्यपालांना भेटणार? ठाकरेंच्या अडचणीत वाढ
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 8:34 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र ते राज्यपालांना देणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोन तृतीआंश शिवसेना (Shiv Sena) आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हेही स्पष्ट आहे. दरम्यान, याबाबत जेव्हा भाजपचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाल पाठिंबा देणार असं जरी म्हटलं, तरीदेखील भाजप तूर्तास तरी वेट एन्ड वॉच, अशी भूमिका असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार करुन नंतर पक्ष निर्णय घेईल, असंही त्यांनी म्हटलंय.

अडीच वर्ष महाविकास आघाडीने जनतेचा घात केला. 2019 मध्ये तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवली आणि तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसलात. यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलेलं नव्हतं, असं देखील त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय म्हणाले?

आता जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी खेळ जिंकला, असं म्हणावं लागेल. पण हे आकडे सातत्यानं बदलत आहेत. त्यामुळे लगेच यावर भाष्य करता येणं कठीण असल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक भारतकुमार राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमका किती आकडा आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. शिंदे यांनी यादी सादर केल्यानंतर नेमकं समीकरण स्पष्ट होईल. या यादीची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच पुढील समीकरणं कशी होतात, यावर बोलणं संयुक्तिक ठरेल. आताच यावर भाष्य करणं घाईच होईल, असंही ते म्हणालेत.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलंय, की 37 आमदार जर एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, तर आता याची पुढील प्रक्रिया विधीमंडळात होईल. सरकारला मुख्यमंत्र्यांना विश्वासमत प्रक्रिया करावी लागेल. विश्वासमत दर्शक जर प्रस्ताव आणायचा असेल, तर अधिवेशन बोलवावं लागले. त्यानंतरच अविश्वास ठराव होऊ शकतं. तोपर्यंत आता असलेले आमदार एकनाथ शिंदेसोबत राहतील का, असाही प्रश्न उपस्थित होतो. सरकार तर अल्पमतात येईलच, पण शिवसेनेच्या अंतर्गत अडचणी आणखी वाढतील, असंही त्यांनी म्हटलंय.

वाचा लाईव्ह अपडेट्स

Eknath Shinde News, Uddhav Thackeray LIVE : भाजपला पाठिंबा देण्याचं पत्र एकनाथ शिंदे राज्यपालांना देणार, स्वत:च्या गटाला शिवसेना असल्याचा दावा करणार

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.