‘वेदांता’वरून गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार; म्हणाले त्यांना वाईनसाठी वेळ मिळाला मात्र…

| Updated on: Sep 17, 2022 | 10:04 AM

वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वेदांता गुजरातला जाण्यासाठी कोण जबाबदार? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

Follow us on

जळगाव :  वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वेदांता गुजरातला जाण्यासाठी कोण जबाबदार? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील आता या वादात उडी घेतली आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. सरकारने प्रकल्पासाठी वेळ न दिल्याने हा प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता असा टोलाही यावेळी महाजन यांनी लगावला आहे.  महाजन यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.  तुम्ही नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून, भाजपाच्या नेत्यांना भाषणाला बोलवून निवडून आलात, आणि नंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.