Dilip Walse Patil Corona Positive | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Dilip Walse Patil Corona Positive |  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 9:56 AM

मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

“कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”, असं ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.

तसेच, “नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे”, असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असं कुठलंही प्रकरण घडलेलं नव्हतं. देशात आणि राज्यात आता कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. संसर्ग संख्याही दिवसेंदिवस घसरत आहेत आणि कोरोना लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने राज्यातील कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.

मात्र, आता दिवाळीच्या तोंडावर कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असता राजकीय नेत्यांनाच कोरोनाची लागण होत आहे. दुसरीकडे, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती. मात्र, आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाने काय परिस्थिती ओढावलीय, अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही

नाशिकमध्ये 735 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, एकट्या सिन्नरमध्ये 155 बाधित

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.