‘वेदांता प्रकल्प गुजरातला का हलवला? पटोले म्हणतात शिंदे, फडणवीस सरकार…

| Updated on: Sep 15, 2022 | 12:47 PM

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Follow us on

वेदांता प्रकल्प (Vedanta project) महाराष्ट्रातून (Maharashtra) गुजरातला (Gujarat)हलवण्यात आला आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेदांताच्या मुद्द्यावरून  राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात गुजरातचे सरकार आहे,  त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने प्रकल्प गुजरातला हलवल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एकनात शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. शिंदे स्वता: च मान्य करतात की ते पंतप्रधान मोदींचे हस्तक आहेत. ते जनतेचे हस्तक म्हणून काम करत नाहीत असं पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच नाणार प्रकल्पा शेजारी गुजराती व्यापाऱ्याने जमीन खरेदी केली होती असा गौप्यस्फोटही पटोले यांनी केला आहे.