‘मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरू’, मोदी यांच्यासमोर नरहरी झिरवळ यांचा कुणावर मोठा आरोप?

"पहिले मी माझा खुलासा करतो. मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे. व्यासपीठावर असलेल्या खुर्चीवर माझं नाव आहे. परवा एका कार्यक्रमाला गेलो. तिथे समोरच्या लोकांची प्रचार सभा होती. तिथे पूजेच्या मांडवात सभा होती. सगळ्यांचे फोन आले. उमेदवारी काय असते हे आम्ही भोगले आहे. आपला विश्वास कसा बसला? याचं मला आश्चर्य वाटत. माझं एकदा हो तर हो आणि नाही तर नाही असतं. आमचा शब्द पक्का असतो", असा खुलासा नरहरी झिरवळ यांनी मोदींसमोर केला.

'मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरू', मोदी यांच्यासमोर नरहरी झिरवळ यांचा कुणावर मोठा आरोप?
मोदी यांच्यासमोर नरहरी झिरवळ यांचा कुणावर मोठा आरोप?
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 5:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा पार पडली. दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नरहरी झिरवळ यांची सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरहरी झिरवळ यांनी भाषण केलं. यावेळी झिरवळ यांनी मोठा खुलासा केला. नरहरी झिरवळ यांच्याबाबत नुकतंच वेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. विरोधी पक्षांच्या प्रचारसभेत नरहरी झिरवळ दिसल्याने ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत जातील, अशा चर्चा सुरु होत्या. अखेर नरहरी झिरवळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सविस्तर याबाबतचा खुलासा केला.

“पहिले मी माझा खुलासा करतो. या मंडळींनी माझं कसं केलंय, माझे असे काही जोडीदार आहेत की, याला ना घरका ना घाटका असं करायचा प्रयत्न सुरु आहे. पण मी तसा आज राजकारणात आहे तसं काही नाही. कैलासवासी हरीभाऊ महाले, सीताराम भोईर असतील, झेडएम कानोळे साहेब असतील, कधी हरिशचंद्र साहेबांच्या सोबत किंवा विरोधात असेल, असं करत-करत मी इथपर्यंत आलो आहे. आता मी येताना, मला काय वाटलं होतं, प्रोटोकॉलप्रमाणे यादी असेल, पंतप्रधान आहेत. आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो”, असं नरहरी झिरवळ म्हणाले.

‘अरे बाबा मी नाराज कसा?’

“उगाच इथे येऊन गर्दी करायची, जो कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्याच शासकीय यंत्रणा म्हणा किंवा आपण सगळे म्हणून आपणच गर्दी करायची, माझ्यापेक्षा मला घडवणारे अनेक जण तुमच्यासारखी सगळी खाली बसली आहेत. तो प्रोटोकॉल आहे. पण मला वाटलं की, आपणही जरा विचारुन घेऊ. आपलं नाव असेल तर वरती जाऊ नसेल तर आपण खालूनही बाय-बाय करु शकतो. पण पत्रकार मित्र माझ्यामागे काय लागले आहेत ते मला माहिती नाही. खुर्चीवर माझं नाव आहे. म्हणजे तुमच्या मनात येणार नाही. ताईंनी सांगितलं की, त्यांना तिथे आवडेल. मला आवडतं. पण पत्रकाक मित्रांनी काय पाहिलं आणि लगेच विचारलं की, तुम्ही काही नाराज आहात का? अरे बाबा मी नाराज कसा?”, असे सवाल नरहरी झिरवळ यांनी केले.

नरहरी झिरवळ यांचा खुलासा नेमका काय?

“मी परवा एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो. वेळो थोडासा मागेपुढे झाला. त्यांची समोरच्यांची प्रचारसभा होती हे मला माहिती नव्हतं. दहा-बारा दिवस अगोदरच अक्षय तृतीयाची पूजा म्हणून मला बोलावलेलं होतं. मला बऱ्याचवेळा असं वाटतं की, पूजेला गेलं तर धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची, प्रसाद घ्यायचं आणि निघायचं. पण मी तसा नाही. मी महाप्रसाद घेतल्याशिवाय निघत नाही. मी गेलो, त्यांची सभा शेवटात होती”, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं.

“मी मंडपाच्या बाहेर उभा राहिलो. आता शेट्टे साहेबांसारखे माझे गुरुवर्य, पण ते त्या बाजूला आहेत आणि मी या बाजूला आहे. म्हणून ते हसायचे. ते म्हणायचे की, या मंडपात. म्हणजे शेट्टे साहेब बोलले नाहीत. पण कार्यकर्ते बोलत होते. मी सांगितलं तुमचं आटोपून द्या. मी पूजेला आलोय. त्यांनी पूजेच्या मंडपातच सभा घेऊन टाकली. आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला. त्यानंतर दिवसभर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह सगळ्यांचे फोनवर फोन. तुझं असं झालं काय? मी त्यांना सांगितलं की, अरे आपल्या उमेदवार भारती ताई त्यांना वेळ नाहीय. कारण मी एकदा उमेदवारी करुन पाहिलेली आहे. मी तेव्हा हरलोय. पण उमेदवार काय असतो हे मी अनुभवलेलं आहे.

भारती ताईंनी म्हणण्यापेक्षा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात केवळ काम, धोरण, नेता याच्याबरोबर पॉलिसी सुद्धा असली पाहिजे. त्यांनी परवा जे केलं ते आपल्याला जमलं नाही. आम्ही परवा साडेअकरा पावणे बारा वाजेपर्यंत आपल्या उमेदवार भारती पवार यांच्याबरोबर होतो. घसा खरडून बोललो, असं काय मला चार तासात झालं की मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो? त्यावर आपला विश्वास बसावा हेच मला नवलं वाटतं. कारण मी एखादी गोष्ट हो म्हटलो तर परत माघारी जात नाही. बाकिच्यांना आमचा आदिवासी शब्द माहिती असेल. आम्ही नामनगरे आहोत. हो तर हो आणि नाही तर नाही. आम्ही एकदा शब्द दिला तो पक्का असतो. त्याचा खुलासा महाले साहेबांनी केला”, असं नरहरी झिरवळ म्हणाले.

“मोदींनी आमच्या आदिवासींसाठी काय-काय केलं, याचा खुलासा केला. आदिवासी गौरव दिनाची घोषणा केली. आजपर्यंत आदिवासींचा गौरव दिन कुणी साजरा केला नव्हता. त्या निमित्ताने आम्ही अनेक वर्ष एकत्र येऊन आदिवासी दिवस साजरा केला. राष्ट्रपती पहिल्यांदा आदिवासी असतील. मी आपल्या महाराष्ट्राच्या 23 आमदारांना घेऊन राष्ट्रपती भवनात गेलो तिथे तेव्हा आम्हाला झोपडी दिसत होती. कारण तिथे आमची बहीण बसलेली होती. एवढं सारं झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जी ट्रीटमेंट दिली, आमचे काही प्रश्न होते, त्यावर मी आहे तोपर्यंत तुमच्या प्रश्नांवर निकाल लागेल. तसेच आणखी काही मागण्या असतील तर सांगा मी राज्यांकडून माहिती मिळवून बदल करायला सांगते, असं आश्वासन त्यांनी दिलं”, असं झिरवळ म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.