AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या 'दगाबाजी'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?
नितीश कुमारImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 28, 2024 | 12:50 PM
Share

पाटना : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यावरून इंडिया आघाडी (India Alliance) मोठा सुरूंग लागला आहे. ही युती ज्या उत्साहाने सुरु झाली होती त्याच गतीने तुटत असल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या ‘दगाबाजी’मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये इतका रोष आहे की, त्यांनी नितीश यांची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असेही ते म्हणाले. आहा प्रश्न हा पडलाय की आघाडीचे पुढे काय होणार?

आघाडीचं पुढे काय?

भाजपाची शक्ती कमकुवत करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठका झाल्या. एनडीएच्या विरोधात पर्यायाची घोषणा करण्यात आली. वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला, मात्र ठोस परिणाम निघाला नसल्याचे चित्र आहे. या सळ्यांमध्ये काँग्रेस मोठा भाऊ म्हणून भूमिका पार पाडत होती. मात्र आता या आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधून ममतांचा एकला चलोचा नारा, दिल्ली आणि पंजाबमधील सामान्य माणसाची वृत्ती आणि या आघाडीचे मुख्य नियोजक नितीशकुमार, एनडीएमध्ये सामील होणे तसेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला आपली नेमकी स्थिती सांगणे यामुळे या आघाडीला सुरूंग लागला आहे.

सध्याची परिस्थिती पाहाता ही युती आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याआधीच तुटत असल्याचं दिसत आहे. यामागचे मूळ कारण असे होते की, ज्या राज्यांत आपला जनमानस गमावला होता, त्या राज्यांतील स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करून काँग्रेसला आपली ताकद वाढवायची होती. लोकसभा निवडणूकींआधी जागा वाटपांवरून मतभेद होण्याची शक्यता असल्याचे भाकित राजकिय विश्लेषकांकडून अनेकदा वर्तवण्यात आले. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे इतर पक्षांच्या भूमिकेत बदल होणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.