दिलीप सोपलांना हरवणाऱ्या बंडखोर आमदाराचा भाजपला पाठिंबा

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत (Rajendra Raut meet CM Devendra fadnavis) भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

Rajendra Raut meet CM Devendra fadnavis, दिलीप सोपलांना हरवणाऱ्या बंडखोर आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळवी सुरु झाली आहे. अनेक अपक्षांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकतंच बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत (Rajendra Raut meet CM Devendra fadnavis) भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पराभव केला (Rajendra Raut meet CM Devendra fadnavis) आहे.

राजेंद्र सोपल यांनी आज (26 ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे. युतीमध्ये शिवसेनेला जागा सुटल्याने राऊत यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला (Rajendra Raut meet CM Devendra fadnavis) होता. भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांना 95 हजार 482 मतं मिळाली. तर सोपल यांना 92 हजार 406 मतं मिळाली. राजेंद्र राऊत यांचा 3076 मताधिक्यांनी पराभव झाला.

Rajendra Raut meet CM Devendra fadnavis, दिलीप सोपलांना हरवणाऱ्या बंडखोर आमदाराचा भाजपला पाठिंबा

बार्शीत सुरुवातीपासूनच अटीतटीची लढत पाहायला मिळत होती. दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर जागावाटपादरम्यान ही जागा शिवसेनेला मिळाली आणि दिलीप सोपल यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता.

Rajendra Raut meet CM Devendra fadnavis, दिलीप सोपलांना हरवणाऱ्या बंडखोर आमदाराचा भाजपला पाठिंबा

बार्शीचे राजकारण आणि इतिहास

राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल हे दोघेही पारंपारिक शत्रू आहेत. राजेंद्र राऊत यांनी 2004 मध्ये शिवधनुष्य हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा विधानसभाही गाठली. त्यावेळी दिलीप सोपल काँग्रेसमध्ये होते. मात्र 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात पुनर्रचना झाली आणि बार्शी कुरघोड्या पाहायला मिळाली. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा काँग्रेसकडे गेली. त्यामुळे काँग्रेसकडून राजेंद्र राऊत यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर दिलीप सोपल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात सोपल यांचा विजय झाला.

त्यानंतर 2014 च्या निवडणुकीच्या एक वर्षाआधी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवलेल्या दिलीप सोपल यांनी राऊत यांचा पराभव केला. यानंतर राऊत यांनी एकहाती नगराध्यक्ष आणि नगरपालिका खेचून आणली. त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये गेले.

मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजेंद्र राऊत यांनी तिकीट मिळेल या आपेक्षेनं भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, युतीच्या जागावाटपात बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली.

त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी भाजपातूनही बंडखोरी करत अपक्ष म्हणून दंड ठोठावले. शिवसेनेने तिकीट नाकारल्याने भाजपत गेलेल्या राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवत सोपल यांचा पराभव केला.

Rajendra Raut meet CM Devendra fadnavis, दिलीप सोपलांना हरवणाऱ्या बंडखोर आमदाराचा भाजपला पाठिंबा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत. मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं आहे. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला, तरी लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजप-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र दिसत आहे.

(Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13

एकूण – 288 (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

संबंधित बातम्या : 

एक जोडीदार संसदेत, एक विधीमंडळात

विधानसभा निकालानंतर अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन

36 आमदारांचा पत्ता कट करुन दुसऱ्यांना तिकीट, यंदाचा निकाल काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *