सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या मालाला मिळणाऱ्या दरावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच शेतकऱ्यांसोबत असंच वागत राहिला तर देश तालिबानच्या दिशेने जाईल, असा इशारा दिला. तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून आहे आणि आता शेतकऱ्यावरही गांजा उत्पादन करण्याची परवानगी मागण्याची वेळ आलीय. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांची दखल घ्या, अन्यथा महागात पडेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. त्यांनी उसाचे दर निश्चित करणाऱ्या कृषी मूल्य आयोगालाही आव्हान दिलं.