AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीची कारवाई लहान मुलांच्या क्रिकेटसारखी, नातू रोहित पवारांचं तिरकस भाष्य

ईडीची कारवाई लहान मुलांच्या क्रिकेटसारखी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे, असं भाष्य रोहित पवार यांनी फेसबुकवरुन केलं आहे

ईडीची कारवाई लहान मुलांच्या क्रिकेटसारखी, नातू रोहित पवारांचं तिरकस भाष्य
| Updated on: Sep 25, 2019 | 7:46 AM
Share

मुंबई : राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर नातू रोहित पवार यांनी फेसबुकवरुन तिरकस भाष्य (Rohit Pawar on Money laundering Case) केलं आहे. ‘लहानपणी क्रिकेट खेळताना चिडका मुलगा आपली बॅट-बॉल घेऊन जायचा, तसा ईडीचा प्रकार सुरु आहे’ असा टोला रोहित पवारांनी लगावला.

‘लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगलं खेळत असेल, तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसंच हे ED चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगलं खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं.’ असं रोहित पवार म्हणतात. ‘फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे.’ असं सांगायलाही रोहित (Rohit Pawar on Money laundering Case) विसरले नाहीत.

भाजप सरकार सूडबुद्धीने शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आज (बुधवार, 25 सप्टेंबर) बारामती बंदची हाक दिली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. बारामतीतील शारदा प्रांगणात सकाळी 10 वाजता नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.

शरद पवार काय म्हणतात?

ज्या संस्थेचा मी सभासदही नव्हतो, त्यात माझं नाव गोवलं गेलंय. याबाबत अधिक काही बोलण्याची गरज नाही. राज्यभरात माझे सुरु असलेले दौरे सुरुच राहतील, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी ‘टीव्ही9 मराठी’ला दिली.

राज्यभरात मला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ही कारवाई झाल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. “मी राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो, तिथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती, तरच मला आश्चर्य वाटलं असतं. निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई होत आहे. महाराष्ट्रातील जनतेसमोर हे आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत उत्तर मिळेल.” असंही पवार म्हणाले होते.

संबंधित बातम्या 

शिखर बँक घोटाळा : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास नकार

पवार काका-पुतण्यांवर ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

पवारांवर ईडीच्या कारवाईनंतर बारामतीत बंदची हाक

मी सभासदही नव्हतो त्या संस्थेच्या खटल्यात नाव गोवलं : शरद पवार

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.