Sanjay Raut on Somaiya : राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्रच लावा, असं राऊत का म्हणाले?
किरीट सोमय्यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला गेलं. त्यावर संजय राऊतांनी टीका केली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीका केली. तसंच राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल, तर ती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे एकाच वेळी लावावी, असा टोलाही लगावला.

मुंबई : किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कारवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपचं (BJP) शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला गेलं. त्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीका केली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीका केली. तसंच राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल, तर ती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे एकाच वेळी लावावी, असा टोलाही लगावला. असं वक्तव्य करण्यामागचं कारही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. उत्तर प्रदेशात 17 बलात्कार झाले असल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. त्याचीही माहिती केंद्रीय गृहसचिवांना द्यावी, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला. दरम्यान, गेल्या दोन वर्षात अनेकदा भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटलंय. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबाबत तक्रारी असतील, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट आधी घ्या, असा सल्ला राऊतांनी यावेळी दिलाय.
संजय राऊतांनी म्हटलंय की…
तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटायला हवं.. मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं.. भेटा ना… उत्तर प्रदेशमध्ये 17 बलात्कार झाले, त्याच्याविषयीही माहिती द्यावी.. राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर यूपी आणि महाराष्ट्रात एकत्रच लावा.. लावा ना.. ढोंग चाललीयत सगळी.. दोन चार लोकं येतात. दिल्लीत उतरतात,गृहसचिवांना भेटतात.. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे… थोडंसं रक्त आलं, तर चालले राष्ट्रपती राजवट लावायला.. महाराष्ट्राशी अडचण आहे, तर तिथल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटा ना आधी, असं आवाहनही त्यांनी केलं.
सोमय्यांसह शिष्टमंडळ दिल्लीत
महाराष्ट्र भाजपचं (BJP) शिष्टमंडळ आज दिल्लात दाखल झालं. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणाची दाद मागायला हे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचलं आहे. सोमय्यांसह भाजप आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. किरीट सोमय्या यांनी स्पेशल टीम पाठवून हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांच्या (Police) मदतीनं हल्ला केला गेला, असा आरोप त्यांनी पुन्हा केलाय. संजय पांडे यांचं निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली.खोटी एफआयआर (FIR) कुणाच्या सांगण्यावरुन करण्यात आली, याची चौकशी करा, अशीही मागणी सोमय्यांनी केली आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
